बॉलिवूडमधील मराठमोळं जोडपं म्हणजे रितेश आणि जिनिलीया देशमुख, हे दोघे काही दिवसांपासून चर्चेत आहेत. हे दोघे लवकरच एका मराठी चित्रपटात दिसणार आहे आणि त्या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांची लाडकी जोडी आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

रितेश जिनिलिया यांच्या ‘वेड’ चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत रितेश आणि जिनिलीयाने या चित्रपटाची माहिती दिली होती. आता ट्रेलर समोर आला आहे. या ट्रेलरमधून या चित्रपटात एकतर्फी प्रेमाची गोष्ट दाखवली गेली आहे. नेहमी आपल्या विनोदाने हसवणारा रितेश यात गंभीर भूमिकेत दिसत आहेत. ज्या व्यक्तीवर प्रेम असते त्या व्यक्तीबरोबर लग्न न झाल्याने रितेशने साकारलेले पात्र हताश होते. दुसरीकडे जिनिलीयाने साकारलेले पात्र हे रितेशने साकारलेल्या पात्रावर जीवापाड प्रेम करत असते. प्रेमासाठी या दोघांची होणारी फरफट दाखवण्यात आली आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!

“मराठीत काम करण्याची संधी मिळाली होती पण…”; रजनीकांत यांनी पत्रकार परिषदेत केलेला खुलासा

चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे संगीत लाभले आहे. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात अशोक सराफ रितेशने साकारलेल्या पात्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच ट्रेलरमध्ये चित्रपटातील इतर कलाकार विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, जिया शंकर आदी कलाकार दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी चित्रपटाची झलक प्रेक्षकांच्या भेटीस आली होती, तेव्हापासून त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. ३० डिसेंबरला त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलीया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे.