हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून या टीझरला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ चांदेकरने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा- Video : देशमुखांची दिवाळी! जिनिलीयाने उटणं लावून दोन्ही मुलांना घातलं अभ्यंगस्नान, व्हिडीओ व्हायरल

सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘झिम्मा २’ च्या ट्रोलबाबत घोषणा केली आहे. उद्या (१३ नोव्हेंबरला) झिम्मा २ ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थने ‘झिम्मा २’ च पोस्टर शेअर करत लिहिलं TRAILER OUT TOMORROW! Reuinion किती धुडूम! होणारे हे उद्या कळेलच! २४ नोव्हेंबर पासून तुमचे आमचे REUNION चित्रपटगृहात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाचा पहिला भाग ‘झिम्मा’ २०२१ मध्ये प्रदर्शित झाला. ‘झिम्माला’ प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. त्यामुळे ‘झिम्मा २’बद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुक्ता निर्माण झाली आहे. २४ नोव्हेंबरला ‘झिम्मा २’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरबरोबर सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.