Singer Rahul Deshpande Divorce : मराठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा घटस्फोट झाला आहे. राहुल व त्यांची पत्नी नेहा १७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर वेगळे झाले आहे. राहुल देशपांडेंनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून घटस्फोटाबद्दल माहिती दिली.
राहुल देशपांडे यांनी सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. राहुल व नेहा वर्षभरापूर्वी कायेदशिररित्या वेगळे झाले आहेत. घटस्फोटानंतर जवळपास वर्षभराने राहुल देशपांडे यांनी घटस्फोटाची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
प्रिय मित्रांनो,
तुम्ही प्रत्येकजण माझ्या प्रवासात एक अर्थपूर्ण भाग राहिला आहात, त्यामुळे मी तुमच्याशी एक वैयक्तिक आणि महत्त्वाची अपडेट शेअर करू इच्छितो. तुमच्यापैकी काहींना ही बातमी मी आधीच शेअर केली आहे. १७ वर्षांच्या लग्नानंतर आणि असंख्य आठवणींनंतर, नेहा आणि मी परस्पर सहमतीने वेगळे झालो आहोत. यापुढे स्वतंत्रपणे आम्ही आमची आयुष्ये जगू. सप्टेंबर २०२४ मध्ये आम्ही कायदेशीररित्या वेगळे झालो.
मी ही अपडेट शेअर करण्यापूर्वी थोडा वेळ घेण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून हा बदल मला स्वीकारता येईल. खासकरून आमची मुलगी रेणुकाच्या, हिताच्या दृष्टीने. ती माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि तिला प्रेम, पाठिंबा व स्थिर आयुष्य देण्यासाठी, मी नेहाबरोबर सह-पालक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडण्यास वचनबद्ध आहे.
वैयक्तिकरित्या आमच्यासाठी एक नवीन अध्याय सुरू होत आहे. पण आई-वडील म्हणून आमचा बाँड आणि एकमेकांबद्दलचा आदर आधीसारखाच असेल.
या काळात आमच्या प्रायव्हसी आणि निर्णयाबद्दल तुम्ही दाखवलेला समजूतदारपणा आणि आदराचं मी कौतुक करतो, असं राहुल यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राहुल देशपांडेंची पोस्ट
राहुल देशपांडे यांची पत्नी नेहादेखील गायिका (Who is Neha Deshpande) आहे. घटस्फोटानंतरही राहुल मुलीचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. त्यात ते नेहा देशपांडेंना देखील टॅग करतात.