दिवाळीनिमित्त सध्या सर्वत्र साफसफाई, रोषणाई व फराळ तयार करण्यास सुरूवात झाली आहे. दिवाळीत घराघरांत रांगोळी काढून दिव्यांची आरास केली जाते. अनेकजण मोठ्या आवडीने एकमेकांना भेटवस्तू देत असतात. दोन दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक मराठी कलाकारांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू पाठवून शुभेच्छा दिल्या होत्या. आता अभिनेत्री अमृता खानविलकरने शेअर केलेल्या भेटवस्तूचा फोटो इन्स्टाग्रामवर चर्चेत आला आहे.

हेही वाचा : शशांक केतकरने शेअर केला मरिन ड्राइव्ह परिसरातील जोडप्यांचा व्हिडीओ; म्हणाला, “हा गोंधळ…”

अभिनयाव्यतिरिक्त उत्तम नृत्यांगणा अशी कलाविश्वात एक वेगळी ओळख अमृताने निर्माण केली आहे. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. तिचे ‘अमृतकला’चे डान्स व्हिडीओ चाहत्यांना विशेष आवडतात. प्रेक्षकांच्या या लाडक्या चंद्रमुखीला दिवाळीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून खास भेटवस्तू पाठवण्यात आली आहे.

इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत अभिनेत्रीने या दिवाळी गिफ्टची झलक तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. राज ठाकरेंनी दिलेली भेटवस्तू स्वीकारत अमृताने राज ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. अमृताने गिफ्टचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “राजसाहेब ठाकरे, शालिनी वहिनी, मिताली व अमित ठाकरे तुम्हाला मनापासून धन्यवाद” असं लिहिलं आहे.

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील लहानग्या कार्तिकीने केल्या चकल्या, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
amruta
अमृता खानविलकर

दरम्यान, अमृता खानविलकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरत ती बहुचर्चित ‘कलावती’ या चित्रपटाता महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ललिता बाबरच्या बायोपिकमध्येही अमृता काम करणार आहे. ‘चंद्रमुखी’च्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांना प्रसाद ओक आणि अमृता खानविलकरची जोडी ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.