दिग्दर्शक नागराज मंजुळे मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचे नेहमीच लक्ष लागलेले असते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘फॅन्ड्री’, ‘नाळ’, ‘सैराट’ या चित्रपटांचे खूप कौतुक झाले. तर सध्या ते त्यांच्या ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. आता अशातच त्यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

जिओ स्टुडिओचा इन्फिनाईट टुगेदर हा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी जिओ स्टुडिओची निर्मिती असलेल्या विविध भाषांमधील आगामी १०० चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यावेळी नागराज मंजुळे यांनी देखील त्यांच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे हा त्यांचा चित्रपट म्हणजे एका महान खेळाडूचा बायोपिक असेल.

आणखी वाचा : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट…” नागराज मंजुळे स्पष्टच बोलले

या त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘खाशाबा’ असं आहे. हा चित्रपट हेलसिंकी येथील १९५२ मधील उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारे फ्रीस्टाइल कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे. याआधी ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कोल्हापूरमध्ये त्यांनी खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. याचबरोबर या चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूरमध्ये करायला आवडेल असेही ते म्हणाले होते. आता ते लवकरच हा चित्रपट घेऊन येणार असल्याची घोषणा केली.

हेही वाचा : “मराठी सिनेसृष्टीत कंपुशाही…” नागराज मंजुळे यांचं वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागराज मंजुळे म्हणाले, “पहिल्यांदाच जिओ स्टुडिओज बरोबर काम करताना मला खूप आनंद वाटतोय. खूप दिवसांपासून हा चित्रपट करण्याचं माझ्या डोक्यात होतं पण काही कारणाने ते पुढे पुढे जात होतं. गेली सहा महिने आम्ही या चित्रपटावर चर्चा करत होतो आणि अखेर आता आम्ही हा चित्रपट करत आहोत. मला आशा आहे हा चित्रपट उत्तम होईल आणि प्रेक्षकांनाही आवडेल.” या चित्रपटात कोण कलाकार असणार आणि त्याचबरोबर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणारे येत्या काही दिवसातच समोर येईल.