Navra Maza Navsacha 2 Box Office Collection Day 4: १९ वर्षांपूर्वी आलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल ‘नवरा माझा नवसाचा २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवस चांगली कमाई करणाऱ्या या चित्रपटाच्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घट झाली. या चित्रपटाचे चार दिवसांचे कलेक्शन किती झाले, ते जाणून घेऊयात.

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf), ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला ‘नवरा माझा नवसाचा २’ २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तीन दमदार कमाई केली, पण सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झाली आहे.

नात करिश्मा जन्मल्यावर तिला पाहायला जाण्यासाठी राज कपूर यांनी दिला होता नकार, ठेवली होती ‘ही’ अट

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १.८६ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली, चित्रपटाने २.४३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ‘नवरा माझा नवसाचा २’ ने ३.५५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. चौथ्या दिवशी या चित्रपटाने १.२० कोटी रुपये कमावले. या चित्रपटाचे चार दिवसांचे कलेक्शन आता ९.०४ कोटी रुपये झाले आहे.

तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “मी भारतात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नवरा माझा नवसाचा २’ मधील कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf), स्वप्नील जोशी, हेमल इंगळे (Hemal Ingale), निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार या चित्रपटात आहेत. यामध्ये श्रिया पिळगांवकर हिचा कॅमिओ देखील आहे.