देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, रिलायन्स इंडस्ट्रीज चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी, रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा व संस्थापक नीता अंबानी नेहमी त्यांच्या लाइफस्टाइलमुळे चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी स्वतःसाठी एक रोल्स-रॉयल फँटम VIII (Rolls Royce Phantom VIII) ही गाडी खरेदी केली. या गाडीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. अशातच एनएमएसीसी (नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर)मधील एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओत नीता अंबानी अजय-अतुलच्या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षपूर्तीनिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रसिद्ध मराठमोळी संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा लाइव्ह कॉन्सर्ट होता. या कॉन्सर्टमध्ये काही मराठी, हिंदीतील लोकप्रिय गायिकांनी परफॉर्मन्स केला. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम रोहित राऊतच्या जबरदस्त परफॉर्मन्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तसंच अजय-अतुलच्या गाण्यांवर प्रेक्षकांना थिरकायला लावलंच. याचा व्हिडीओ नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर या युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – एकेकाळी खोटे दागिने विकले, ऑफिस बॉयची केली नोकरी; १५व्या वर्षी ‘इतका’ होता अक्षय कुमारचा पगार

या व्हिडीओत, अजय-अतुलचा लाइव्ह कॉन्सर्टमधील काही खास क्षण दाखवण्यात आले आहेत. प्रेक्षक नाचताना दिसत आहेत. एवढंच नाहीतर अजय-अतुलच्या ‘झिंगाट’ गाण्यावर नीता अंबानी देखील डान्स करण्याचा मोह आवरला नाही. त्या खुर्चीतून उठून झिंगाटवर डान्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अजय-अतुलचा लाइव्ह कॉन्सर्ट सुरू होण्यापूर्वी नीता अंबानी यांनी प्रेक्षकांबरोबर मराठीतून संवाद साधला होता. “हे दोघे भाऊ संगीत वेडाने झपाटलेले आहेत, मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे म्हणून मला माहित आहे की ते केवळ चांगले कलाकारच नाही तर खूप चांगले व्यक्तीही आहेत,” असं म्हणत अजय-अतुलचं नीता अंबानींनी कौतुक केलं होतं.