मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत लग्नानंतर अनेकदा चर्चेत आली आहे. सध्या पूजा आणि तिचा पती सिद्धेश चव्हाण ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहेत. कारण- पूजाचा नवरा ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत कामाला आहे.

पूजा आणि सिद्धेशने लग्नानंतरचा त्यांचा पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा ऑस्ट्रेलियात मराठी परंपरेनुसार साजरा केला. त्याचे फोटो पूजाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच आता सिद्धेशचा वाढदिवस काही दिवसांवर आलाय. पूजाने त्याची तयारीदेखील सुरू केलीय. या प्री-बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो चर्चेत आहेत.

हेही वाचा… मातीचं घर, विटांची चूल अन्…, मृण्मयी देशपांडेने पतीसह शेतात बांधलं घर

पूजा सावंतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पती सिद्धेशबरोबर काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत पूजा सिद्धेशच्या हातात हात घालून बसली आहे. ‘वाढदिवसापूर्वीचं सेलिब्रेशन सुरू झालं आहे’, असं कॅप्शन पूजानं या फोटोला दिलं आहे. सिद्धेशनं यात काळ्या रंगाचं टी-शर्ट व त्यावर सफेद रंगाचं जॅकेट आणि जीन्स घातली आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये सूर्यास्त होत असलेल्या सुंदर अशा वातावरणामध्ये पूजा आणि सिद्धेश एकमेकांकडे बघत रोमॅंटिक पोज देताना दिसतायत. नुकतेच पूजानं त्यांच्या वीकेंडचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पूजा आणि सिद्धेश आकाशपाळण्यात बसले होते. दोघांनी वीकेंडचा पुरेपूर आनंद लुटला.

सिद्धेशचा वाढदिवस जवळ आला असून, पूजा आधीपासूनच त्या तयारीला लागली आहे. सिद्धेशच्या वाढदिवसाचेही फोटो ती तिच्या चाहत्यांबरोबर लवकरच शेअर करील.

हेही वाचा… मानसी नाईकच्या कथित बॉयफ्रेंडने शेअर केला पॅरिसमधला खास फोटो; म्हणाला, “माझं प्रेम…”

दरम्यान, अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांनी २८ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. साखरपुडा, संगीत, मेंदी, हळद व सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा पाहायला मिळाला. पूजा आणि सिद्धेशच्या लग्नसोहळ्याला प्रार्थना बेहेरे, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, सुखदा व अभिजीत खांडकेकर अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.