मागच्या काही दिवसांपासून मराठी चित्रपट ‘मुसाफिरा’ ची चर्चा आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस बाकी असताना आता ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चाहते खूप दिवसांपासून चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. चित्रपटाचं प्रमोशन सुरू करूनही ट्रेलर आला नव्हता, पण आज ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी व पुष्कराज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट हा मान मिळवणाऱ्या पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते ट्रेलरमध्ये दिसतात. मैत्री म्हटलं की प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, भांडण या सगळ्या गोष्टी येतात. या सफरीचा मनमुराद आनंद लुटताना हे पाचही मित्र धमाल करणार आहेत. हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार, हे पाहण्यासाठी आपल्याला २ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

२१.२ मिलियन प्रेक्षकांनी २०२३ मध्ये ओटीटीवर सर्वाधिक पाहिला ‘हा’ वादग्रस्त बॉलीवूड चित्रपट; तुम्ही बघितलाय का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणाला, “मुसाफिराच्या माध्यमातून मला प्रेक्षकांसाठी काहीतरी दर्जेदार करायचं होतं. लॉकडाऊनच्या काळात सुचलेली माझी ही कथा चित्रपटात मांडण्याचा माझा हा प्रयत्न होता. मैत्रीची नवीन परिभाषा या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. आयुष्यात मैत्री किती महत्वाची हेही ‘मुसाफिरा’च्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. मैत्रीपर भाष्य करणारा हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट आहे.”