Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding : ‘दगळी चाळ’ फेम महाराष्ट्राची लाडकी कलरफूल अभिनेत्री पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा चालू आहे. साखरपुडा, व्याही भोजन, संगीत, मेहंदी आणि हळदी समारंभानंतर आता पूजाच्या विवाहसोहळ्याची चर्चा रंगली आहे.

नववधू पूजा सावंतचा पहिला लूक तिची बहीण रुचिराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुंडावळ्या, डोक्यावर बिंदी, सुंदर साडी, भरजरी दागिने, हातात हिरवा चुडा अशा पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे.

हेही वाचा : “प्रेम आमचं खरंय, नाही थिल्लर ‘टाइमपास’…”, प्रथमेश परबच्या पत्नीचा भन्नाट उखाणा! म्हणाली, “अहोंसाठी…”

पूजाने लग्नातील प्रत्येक समारंभासाठी सुंदर व आकर्षक असा लूक केला होता. भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, गौरी महाजनी, प्रार्थना बेहेरे, शाल्मली, सुखदा खांडकेकर असे सिनेविश्वातील बरेच कलाकार अभिनेत्रीच्या लग्नातील प्रत्येक विधीसाठी उपस्थित होते.

pooja
पूजा सावंत पहिला लूक

हेही वाचा : ‘पंचायत २’ फेम अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू, चार भोजपुरी कलाकारांसह ९ जणांनी गमावला जीव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूजाचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं आहे. सिद्धेश चव्हाण कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो. वर्षभर एकमेकांना वेळ दिल्यावर नोव्हेंबर महिन्यात अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. सध्या संपूर्ण मराठी कलाविश्वातून पूजा आणि सिद्धेशवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.