छोट्या पडद्यावरील मालिका असो किंवा चित्रपट अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने तिच्या चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘मितवा’ चित्रपट, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही गाजलेली मालिका यामुळे गेल्या काही वर्षात प्रार्थनाच्या चाहत्यावर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

‘गुलाबी साडी’ या गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. संजू राठोडच्या या गाण्याला सगळ्यांनीच पसंती दर्शवली आहे. प्रार्थना बेहेरेला सुद्धा या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही. अभिनेत्रीने खास साडी नेसून या गाण्यावर व्हिडीओ शूट केला आहे.

maharashtrachi hasya jatra fame namrata sambherao dances on gulabi saree
Video : केसात गजरा, गुलाबी साडी अन्…; नम्रता संभेरावचा लोकप्रिय गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
Pune School Girl Floating In Air Viral Video, Medical Emergency Not Superstitions
पुण्याच्या शाळेत विद्यार्थिनी हवेत अर्धवट तरंगायला लागली? मित्रांनी सांभाळण्याचा प्रयत्न करताच..Video पाहून भरेल धडकी
naach ga ghuma fame mukta barve dance near new york times square
Video : घुमा जोरात नाचतेय…! मुक्ता बर्वेचा न्यूयॉर्कमध्ये मराठमोळा अंदाज; साडी नेसून केला जबरदस्त डान्स
Punerkar boy marriage biodata viral
Photo: “पोरगी कसली पण असुदे फक्त…” पुणेकर तरुणानं लग्नाच्या बायोडेटात लिहली अशी अपेक्षा; बायडेटा पाहून पोट धरुन हसाल
gharoghari matichya chuli fame reshma shinde and bhakti desai
Video : ‘देख तुनी बायको कशी…’ रेश्मा शिंदेचा खानदेशी गाण्यावर जबरदस्त डान्स; म्हणाली, “जेव्हा नणंद…”
amruta khanvilkar shares special post for prasad oak wife manjiri
प्रसाद ओकच्या बायकोचा वाढदिवस! अमृता खानविलकरची मंजिरीसाठी खास पोस्ट, ‘असं’ केलं सेलिब्रेशन

हेही वाचा : स्वप्नपूर्ती! रुचिरा जाधवने घेतलं नवीन घर, दारावरच्या पाटीवर लावलं आई-बाबांचं नाव, फोटो शेअर करत म्हणाली…

‘गुलाबी साडी’ या गाण्यावर डान्स करण्यासाठी प्रार्थनाने खास इंडो-वेस्टर्न लूक केला होता. गुलाबी रंगाची साडी, त्यावर पिवळ्या रंगाचा ब्लाऊज, गळ्यात सुंदर असा नेकलेस असा लूक अभिनेत्रीने केला होता. अभिनेत्रीने या व्हिडीओला “माय गुलाबी लव्ह” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : ‘हे मन बावरे’ फेम शशांक केतर व मृणाल दुसानिस पुन्हा झळकणार एकत्र? अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

दरम्यान, प्रार्थना बेहेरेने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अवघ्या काही तासांतच अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर साडेचार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.