scorecardresearch

Video : “माझं काही चुकलं का?” प्रसाद ओकने ‘तो’ व्हिडीओ शेअर करत विचारला प्रश्न

प्रसाद ओकचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Video : “माझं काही चुकलं का?” प्रसाद ओकने ‘तो’ व्हिडीओ शेअर करत विचारला प्रश्न
प्रसाद ओकचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक कायमत त्याच्या कामामुळे चर्चेत राहिला आहे. सोशल मीडियावरही तो बराच सक्रिय असतो. पत्नी मंजिरी ओकबरोबर तर तो अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आताही प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तो माझं काय चुकलं? असं विचारताना दिसत आहे.

आणखी वाचा – पांढरे केस, मिशी अन् थकलेला चेहरा, अविनाश नारकरांना तुम्ही ओळखलं का? लग्नाला २७ वर्ष पूर्ण होताच म्हणाले…

प्रसादने एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो चेहऱ्यावरील हावभाव बदलताना दिसत आहे. तसेच या रिल व्हिडीओमधील संवाद अधिक लक्षवेधी आहेत. प्रसादचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं आहे.

बेबी भाग्यवानला इंग्रजी भाषेमध्ये काय म्हणतात? या प्रश्नावर उत्तर मिळतं अविवाहित. हा रिल व्हिडीओ असला तरी प्रसादच्या चेहऱ्यावरील हावभाव पोट धरून हसवणारे आहेत. तसेच त्याच्या चाहत्यांनीही यावर अनेक कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – तीन महिन्यांपूर्वी मावशीचं झालं निधन, अमृता खानविलकर भावूक होत म्हणाली, “कारण तिला मी…”

दादा खरंच तू चुकलास, आता मंजिरी वहिनी तुला मारणार अशा अनेक कमेंट व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केल्या. तर प्रसादच्या चेहऱ्यावरील हावभावही अगदी पाहण्यासारखे आहेत. काही तासांमध्येच प्रसादच्या या व्हिडीओला चार हजारांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 13:10 IST

संबंधित बातम्या