मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत सध्या चर्चेत आहेत. दोघे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अनेकदा भन्नाट रील्सही चाहत्यांबरोबर शेअर करीत असतात. अशातच आता प्रिया आणि उमेशने एक मजेशीर रील सोशल मीडियावर शेअर केली आहे; जी सध्या व्हायरल होतेय.

उमेशने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ सुरू होताच प्रिया उमेशला सांगते की, चांगले फोटो काढ हा. प्रिया पोज देते आणि उमेश फोटो काढतो. फोटो काढल्यानंतर प्रिया लगेच उमेशला सांगते की, फोटो बघू. मग उमेश तिला म्हणतो, तुला का बघायचेत? अगं, मी ते एडिट वगैरे करतो आणि मग तुला दाखवतो. प्रिया त्याला मस्करीत म्हणते की, तू फोटो एडिट करणार आणि फोनमध्ये फोटो बघते. पण, फोनमध्ये तिला तिच्याऐवजी उमेशचेच फोटो दिसतात. तेवढ्यात ती उमेशला म्हणाली की, माझे फोटो कुठे आहेत? यावर उमेश म्हणाला की, तू म्हणालीस ना चांगले दिसतील असे फोटो काढ. तू असं कुठे म्हणालीस की, माझे फोटो काढ. माझे फोटो काढ, असं नाही म्हणालीस. हे ऐकताच प्रिया उमेशच्या मागे पळते आणि त्याला मारायला जाते.

‘संसारातील मजा टिकवायला आणि काय हवं?’ असं कॅप्शन उमेशनं या व्हिडीओला दिलं आहे. प्रिया आणि उमेशनं हा खास व्हिडीओ खरं तर आगामी चित्रपट ‘एक दोन तीन चार’च्या प्रमोशनसाठी केला होता. या कपलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकानं कमेंट करीत लिहिलं, “घोर अपमान केलास रे.” दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “सेल्फी लिया भाई ने.” एक जण म्हणाला, “मस्त फसवलंय प्रियाला.”

वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘एक दोन तीन चार’ चित्रपट १९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात निपुण धर्माधिकारी, वैदेही परशुरामी, करण सोनावणे, हृषिकेश जोशी, असे कलाकार आहेत.

हेही वाचा… …म्हणून ‘तारक मेहता’ फेम गुरुचरण सिंग झाला होता बेपत्ता; अभिनेता खुलासा करत म्हणाला, “घरी कधीच परत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उमेश आणि प्रियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, उमेश शेवटचा ‘माय-लेक’ या चित्रपटात झळकला होता. लवकरच त्याचा ‘येरे येरे पैसा-३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रफूचक्कर’ या हिंदी भाषिक वेब सीरिजमध्ये प्रिया शेवटची झळकली होती.