सध्या सोशल मीडियावर सर्वत्र ‘गुलाबी साडी’ या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. सामान्य लोकांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येक जण या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक अभिनेत्रींनी खास गुलाबी रंगाची साडी नेसून या व्हायरल गाण्यावर रील व्हिडीओ बनवले आहेत. परंतु, सध्या दिग्दर्शक रवी जाधव यांनी शेअर केलेला त्यांच्या पत्नीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

दिग्दर्शक रवी जाधव यांनी मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची पत्नी मेघना यांनी संजू राठोडच्या “गुलाबी साडी आणि लाली लाल लाल” या गाण्यावर चक्क खोल समुद्रात डान्स केला आहे. याचा खास व्हिडीओ दिग्दर्शकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : ‘कन्यादान’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, मराठी कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

रवी जाधव पत्नीचा व्हिडीओ शेअर करत लिहितात, “मेघना आणि तिच्या मैत्रिणींचा अंडरवॉटर मराठी ठसका…इंडोनेशियात खोल समुद्रात डान्स करणं म्हणजे अगदी वेगळ्या जगासारखं वाटतं. या सुंदर गाण्यासाठी संजू राठोडचे खूप खूप आभार.” यामध्ये मेघना यांच्यासह त्यांच्या दोन मैत्रिणी स्कूबा डायव्हिंग करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ‘जीव माझा गुंतला’ मालिकेमुळे पहिली भेट ते लग्न! ‘अशी’ आहे योगिता-सौरभची लव्हस्टोरी, पहिलं कोणी केलं प्रपोज?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दिग्दर्शकाच्या पत्नीचा मराठी गाण्यावरचा हटके डान्स व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांसह त्यांच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.