रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी सध्या प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गेले अनेक दिवस त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. अखेर ३० डिसेंबरला तो सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेलं आहे. या चित्रपटाचे सर्वच शो सध्या हाऊसफुल असलेले पाहायला मिळत आहेत. अनेक कलाकारांनी या चित्रपटाच्या गाण्यावर व्हिडीओ बनवले आहेत. आता त्यात रिंकू राजगुरूचा समावेश झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं. तर त्याची पत्नी जिनिलीया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं आहे. तसं असलं तरीही हा चित्रपट दमदार कामगिरी करताना दिसतोय. ११ दिवसात या चित्रपटाने ३५ हून अधिक कोटींची कमाई केली. तसंच ५.७० कोटींचा गल्ला जमवत ‘एका दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट’ हा सैराटच्या नावे असलेला विक्रम ‘वेड’ने मोडला. आता सैराटच्या आर्चीला ‘वेड’ची भुरळ पडली आहे.

आणखी वाचा : ‘वेड’ची यशस्वी घोडदौड, ‘सैराट’पाठोपाठ मोडला ‘या’ चित्रपटाचा विक्रम

तिने नुकतंच इन्स्टाग्रामवर तिचं एक रील पोस्ट केलं. ‘वेड’ चित्रपटाच्या ‘सुख कळले’ या गाण्यावर तिने हा व्हिडीओ बनवला आहे. हे रील बनवताना तिने लाल रंगाची साडी नेसलेली असून कपाळावर लाल टिकली, हातात लाल बांगड्या, गळ्यात मोत्याची माळ आणि केसांचा आंबाडा घालत त्यावर गजराही मळला आहे. तसंच या व्हिडीओत ती स्मितहास्य देत लाजतानाही दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. तसंच तिचा हा व्हिडीओ रितेश देशमुखनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

हेही वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत भांडू लागली, व्हिडीओ व्हायरल

या चित्रपटाच्या टीझरला, सगळ्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे चित्रपटगृहातही हा चित्रपट चांगलीच कामगिरी करणार विश्वास सगळ्यांना होता. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. प्रमाणे अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rinku rajguru shared a video using sukh kalale song from ved film rnv
First published on: 11-01-2023 at 16:25 IST