रितेश आणि जिनिलीया देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘वेड’ चित्रपट ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. याशिवाय ‘वेड’मधील सर्व गाणी आज वर्षभरानंतरही चर्चेत आहेत. रितेशचा दिग्दर्शक म्हणून, तर जिनिलीयाचा मराठी कलाविश्वात अभिनेत्री म्हणून हा पहिलाच चित्रपट होता.

‘वेड’ चित्रपटाला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने रितेश देशमुखने एक खास पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अभिनेत्याच्या आईच्या हस्ते सेटवर मुहूर्ताचा शॉट पार पडल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ‘सुख कळले’ या लोकप्रिय गाण्याचा तो शॉट होता. आईच्या हस्ते शुभारंभ, मोठा मुलगा रियानवर ‘अ‍ॅक्शन’, तर धाकटा लेक राहिलवर कट बोलण्याची जबाबदारी अभिनेत्याने सोपवली होती.

हेही वाचा : “करोना परत आलाय…”, ‘लावणी क्वीन’ मेघा घाडगेने शेअर केला रुग्णालयातील व्हिडीओ, चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

‘वेड’ चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रितेश लिहितो, “हे सगळंच अविश्वसनीय होते. कधी एक वर्ष पूर्ण झालं समजलंच नाही. गेल्यावर्षी आम्ही दोघंही या दिवसात थोडेसे दडपणाखाली होतो परंतु, त्यानंतर तुमच्याकडून मिळालेलं प्रेम पाहून धन्य झालो. तुमचीच टीम ‘वेड'”

हेही वाचा : Video : लग्नानंतर मुग्धा वैशंपायनचं सासरी ‘असं’ झालं स्वागत! उखाणा घेत प्रथमेश म्हणतो, “माझी गरीब गाय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रितेश देशमुखने शेअर केलेल्या या खास व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी “‘वेड’ चित्रपटाचा दुसरा भाग बनव” अशी मागणी अभिनेत्याकडे केली आहे.