ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे गेली अनेक दशकं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. अशोक मामांबरोबर एकदा तरी काम करता यावं असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. आता गेली अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर रितेश देशमुखचं ते स्वप्न पूर्ण झालं आहे.

रितेश सध्या वेळ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्यात तो प्रमुख भूमिका साकारतच आहे पण त्याचप्रमाणे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही त्याने सांभाळली आहे. ‘वेड’च्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शनात पाऊल टाकलं आहे. या चित्रपटात त्याच्या वडिलांच्या भूमिकेत अशोक सराफ आहेत. एका मुलाखतीत त्याने अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला.

आणखी वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

रितेश देशमुखचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात तो अशोक मामांबद्दल बोलताना दिसत आहे. रितेश म्हणाला, “अशोक मामांसारख्या महानायकाबरोबर काम करायला मिळणं हे माझं भाग्य आहे. मी गेली अनेक वर्ष याची वाट बघत होतो. अखेर वीस वर्षांनी मला ती संधी मिळाली. या चित्रपटात मी त्यांच्याबरोबर अभिनयही करतोय आणि त्यांना दिग्दर्शितही करतोय यापेक्षा आनंदाची दुसरी कुठलीही गोष्ट माझ्यासाठी असू शकतं नाही.” त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्तही रितेशने त्यांच्यासाठी एक खास व्हिडीओ शेअर केला होता.

हेही वाचा : “मी सर्वांना ‘तुम्ही’ पण फक्त आईला ‘तू’ अशी हाक मारतो कारण…” रितेश देशमुखच्या उत्तराने जिंकलं मन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘वेड’ या चित्रपटाला प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद देत आहेत. ह्या चित्रपटाने एका आठवड्याच्या आतच कमाईचा एकूण १५ कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटात रितेश-जिनिलिया आणि अशोक सराफ यांच्या व्यतिरिक्त शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. तर अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.