रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी ते विवाहबंधनात अडकले. रितेश-जिनिलीयाच्या लग्नाला आज ११ वर्ष पूर्ण झाली आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रितेशने त्याची पत्नी जिनिलीयासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जिनिलीयाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला खास कॅप्शन देत रितेशने पत्नीसाठी पोस्ट लिहिली आहे. “माझा आनंद, हक्काची जागा आणि माझं आयुष्य…बायको, लग्नाच्या ११व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, असं म्हणत रितेशने जिनिलीया खास शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>> Video: “…तूच माझा महाराष्ट्र, तूच माझी हास्यजत्रा” वनिता खरातने पती सुमितसाठी घेतला खास उखाणा

रितेश देशमुखने शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी जिनिलीया व त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक कलाकारांनीही रितेशच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा>> महेंद्रसिंग धोनीचा खाकी वर्दीतील फोटो व्हायरल; नेटकरी म्हणाले “सिंघम ३ मध्ये…”

प्रेक्षकांची लाडकी जोडी असलेले रितेश-जिनिलीया वेड चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. तर जिनिलीयाने मराठी चित्रपचसृष्टीत पदार्पण केलं आहे. रितेश देशमुखचा ‘वेड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.