ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आज त्यांचा ७३वा वाढदिवस साजरा करत आहेत. मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. अनेक कलाकारांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अशातच त्यांच्या प्रवासादरम्यान विमानात एक स्पेशल शुभेच्छा त्यांना देण्यात आलीय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

“चारचौघी” नाटकाच्या प्रयोगासाठी विमानातून प्रवास करताना रोहिणी हट्टंगडी यांच्यासाठी एक स्पेशल घोषणा झाली. “आपल्या विमानात एक अशी व्यक्ती आहे जिचा आज वाढदिवस आहे आणि आज ती ७३ वर्षांची झाली आहे. ती एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे आणि तिचं नाव रोहिणी आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त टाळ्या वाजवून तिला शुभेच्छा देऊयात.”

“सरप्राईज सरप्राईज, आमच्या प्रेमळ रोहिणी ताईसाठी सिॲटल ते सॅन होजेच्या विमानात वाढदिवसानिमित्त विशेष घोषणा” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं होत

हेही वाचा… “सलोना सा सजन…”, पूजा सावंतने शेअर केला मेहेंदी सोहळ्यातील खास व्हिडीओ

“आज रोहिणी हट्टंगडी यांचा वाढदिवस! हॅप्पी बर्थडे रोहिणी हट्टंगडी ताई. त्या सध्या अमेरिकेत, “चारचौघी” नाटकाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्या सिॲटल ते सॅन होजे विमानप्रवास करत असताना, अचानक एयरलाईन्स तर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अत्त्युच्च आनंदी क्षण .” संजय पेठे यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आणि असं कॅप्शन दिलं.

हेही वाचा… लक्ष्मीच्या पावलांनी : नयना आणि राहुल लवकरच अडकणार लग्नबंधनात; अद्वैतच्या निर्णयाला कलाचा पाठिंबा, पाहा प्रोमो

दरम्यान, रोहिणी हट्टंगडी यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, इच्छामरणाच्या गोष्टीवर आधारित असलेल्या ‘आता वेळ झाली’ या चित्रपटात त्या नुकत्याचं झळकल्या होत्या. ‘द फॅमिली स्टार’ या तेलुगू चित्रपटातदेखील त्या दिसल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहिणी हट्टंगडीना मिळालं बर्थडे सरप्राईज! अमेरिकेत विमान प्रवासादरम्यान मिळाल्या कंपनीकडून शुभेच्छा