दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून आकाश ठोसरकडे पाहिले जाते. सैराट चित्रपटातील परश्या या पात्रामुळे तो घराघरात पोहोचला. आकाश ठोसर हा लवकरच घर, बंदूक, बिरयानी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी केलं आहे. नुकतंच आकाश ठोसरने मराठी सिनेसृष्टीतील कंपूशाहीबद्दल भाष्य केले.

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीबद्दल भाष्य केले होते. त्यावेळी तिने “नागराज मंजुळेही आकाश ठोसरला त्याच्या चित्रपटांमध्ये घेतोच की… असं काही नाही की फक्त संजय जाधवच कंपूशाही करतात. प्रत्येकाचा वेगळा ग्रुप आहे.” असे म्हटले होते. त्यावर एका मुलाखतीत आकाश ठोसरला विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले.


आणखी वाचा : “नागराज मंजुळे आकाशला…” मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीबद्दल तेजस्विनी पंडित स्पष्टच बोलली

आकाश ठोसर नेमकं काय म्हणाला?

“सर्वात आधी मी स्वत:ला नशीबवान समजतो की मला अण्णांबरोबर काम करायला मिळालं. ‘सैराट’मधील ‘परश्या’ असू दे किंवा ‘झुंड’मधला ‘संभ्या’ असू दे, मीच का? असे मी मागे एकदा अण्णाला विचारले होते. कदाचित त्यांना माझ्यात काही तरी दिसलं असेल म्हणून त्यांनी माझं कास्टिंग केलं असावं. त्यांनी ‘सैराट’साठी अनेकांचे ऑडिशन घेतले होते. पण त्यातून माझी निवड झाली. तेव्हा ते मला म्हणाले होते की, तुझे डोळे खूप छान आहे. ते खूप बोलके आहेत. त्यानंतर मग माझी निवड झाली आणि आम्ही एकत्र काम केलं.

‘परश्या’नंतर आम्ही ‘संभ्या’चे पात्र केलं. ‘सैराट’नंतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. त्यातील पात्र हे सारखेच होते. मला त्यातून कुठे तरी बाहेर पडायचं होतं. त्यामुळे मी ‘संभ्या’ हे पात्र केलं. ते पात्र जरा वेगळं आणि हटके होतं.

त्यानंतर मग काही पात्रांची ऑफर मिळाली नाही. मग ‘बिरयानी’ या चित्रपटाची चांगली कथा अण्णांकडे आली. मी या चित्रपटात जे पात्र साकारतोय ते तुझंच पात्र आहे आणि ते तूच केलं पाहिजे. बाकी तुम्ही जे काही बोलता त्याबद्दल मला फारसं काही कळत नाही”, असे आकाशने यावेळी म्हटले.

आणखी वाचा : “मी तयार, फक्त तिला…” आकाश ठोसरने सांगितली लग्नासाठीची एकमेव अट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आकाश ठोसर हा लवकरच ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात झळकणार आहे. येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.