मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट १४ जून २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी इथं या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे.

मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट बेतला आहे. काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. आता हा चित्रपट तयार झाला असून तो प्रेक्षकांना दोन आठवड्यांनी सिनेमागृहांमध्ये पाहता येणार आहे.

“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…

मनोज जरांगे पाटील यांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशी साद अवघ्या महाराष्ट्राला या चित्रपटातून दिली आहे. लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला? हे देशाला समजलंच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण तात्काळ जाहीर झालेच पाहिजे एवढच आम्हाला समजतं, असे अनेक मुद्दे या चित्रपटाच्या माध्यमातून मांडले आहे. सध्या अवघ्या महाराष्ट्रात या चित्रपटाची चर्चा आहे. संघर्षयोद्धा या चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच गाजत आहे. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहेत. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास १४ जूनपासून प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येईल.

हिरवी पैठणी, नाकात नथ अन् चंद्रकोर, Cannes च्या रेड कार्पेटवर मराठी लूकमध्ये अवतरलेली ‘ती’ कोण? जगभरात होतेय चर्चा

चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी

या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे, श्रीकृष्ण शिंगणे यांच्या ही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

पहिलं लग्न मोडल्यावर वयाने लहान कृष्णाच्या प्रेमात पडली होती कश्मीरा शाह, अभिनेत्री ५२ वर्षांची, तर पती फक्त…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड ,जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे पाटील, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ. सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.