महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जावं लागलं होतं. जवळपास तीन महिन्यांनी ते तुरुंगातून बाहेर आले. त्यानंतर ते सातत्याने सत्तेतील एकनाथ शिंदे आणि भाजपा सरकारवर परखड टीका करत असतात. संजय राऊत हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. एकेकाळी पत्रकार असलेल्या संजय राऊत यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं योगदान आहे.
“‘धर्मवीर’ चित्रपट आनंद दिघेंवर नव्हता, तर…” संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला
अलीकडच्या काळात राजकारण्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनत आहेत. महाराष्ट्रानेही दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपट पाहिला. त्याशिवाय बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाची निर्मितीही झाली होती. ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी ठाकरे चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा केली. तसेच ‘धर्मवीर’ चित्रपटाचा दुसरा भागही येणार असल्याचं निर्मात्यांनी सांगितलंय. त्यावरही प्रतिक्रिया दिली.
उर्फी जावेदने पुन्हा केलं ट्वीट, स्वत:च्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत म्हणाली, “…चित्राताई ग्रेट है”
“धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागात आनंद दिघे यांचं निधन झालंय, त्यामुळे दुसऱ्या भागात धर्मवीर कोण असतील, हे पाहावं लागेल,” असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांना तुमच्या जीवनावर आधारित बायोपिक बनल्यास त्यात कोणत्या अभिनेत्याने तुमची भूमिका साकारलेली तुम्हाला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘मीच माझी भूमिका करेन’, असं राऊत म्हणाले. पुढे तुमच्या बायोपिकचं नाव काय असेल, असं विचारण्यात आलं, त्यावर ‘माझ्या बायोपिकचं नाव संजय उवाच असेल’, असं राऊत म्हणाले.
‘ठाकरे २’ चित्रपटाबाबत संजय राऊत यांचा खुलासा, म्हणाले, “जर एकनाथ शिंदेंवर चित्रपट येऊ शकतो तर…”
दरम्यान, संजय राऊतांच्या जीवनावर आधारित चित्रपट येईल की नाही हे येत्या काळात कळेल, पण आपल्या बायोपिकमध्ये आपणच अभिनय करावा, अशी इच्छा संजय राऊत यांनी बोलून दाखवली.