scorecardresearch

Video: पुरस्कार सोहळ्यातील डोळ्यांत पाणी आणणारा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थ जाधवची पोस्ट, म्हणाला “अशोक मामा…”

सिद्धार्थ जाधवची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट

siddharth jadhav shared ashok saraf video
सिद्धार्थ जाधवची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा यंदाच्या झी चित्रगौरव सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने अभिनय सम्राट अशोक सराफ यांचा गौरव करण्यात येणार आहे.

गेली कित्येत दशकं अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या लाडक्या अशोक मामांचा मराठी व हिंदी कलाविश्वातील प्रवासाचा उलगडा अभिनेता सिद्धार्थ जाधवने त्याच्या नृत्याविष्काराने सादर केला. परफॉर्मन्स सादर करून झाल्यानंतर सिद्धार्थ मंचावरुन खाली उतरुन समोरच बसलेल्या अशोक सराफ यांच्याजवळ गेला. हातातील फुलांचा हार अशोक सराफ यांना घालून त्यांना साष्टांग नमस्कार केला. सिद्धार्थ जाधवची ही अनोखी मानवंदना पाहून अशोक सराफ यांच्यासह उपस्थितही भारावून गेले. अशोक सराफ यांच्यासह कित्येकांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

हेही वाचा>> “केसाला फॉइल पेपर का लावला आहे?” मलायका अरोराच्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले “म्हातारपणात…”

सिद्धार्थ जाधव व अशोक सराफ यांचा अंगावर काटा व डोळ्यांत पाणी आणणारा झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता सिद्धार्थने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने “लव्ह यू अशोक मामा. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यातील सर्वात सुंदर क्षण…” असं कॅप्शन देत त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे.

हेही वाचा>> “नाटू नाटूला माझ्यामुळे ऑस्कर मिळाला” अजय देवगणचं ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये वक्तव्य, म्हणाला…

मालिका, नाटक व चित्रपट अशा सगळ्याच माध्यमात काम करुन अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘साडे माडे तीन’, ‘शेजारी शेजारी’, ‘आमच्यासारखे आम्हीच’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. मराठीबरोबर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 15:00 IST

संबंधित बातम्या