सध्या मराठीत विविध धाटणीचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटांवर प्रेक्षकही भरभरुन प्रेम करताना दिसतात. आता लवकरच एक कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शॉर्ट अँड स्वीट’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडील आणि मुलाचे नाते हे नेहमीच संवेदनशील असते. मुळात वडील आणि मुलाचे नाते आईच्या माध्यमातून जोडले जाते. ती या दोघांमधील दुवा असते. त्यामुळे या नात्यात खरी कसोटी असते ती आईची. या नात्यात सुसंवाद साधला गेला तर हे नाते खूप सुंदर बहरु शकते. अशाच नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट अँण्ड स्वीट’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”

या ट्रेलरची सुरुवात आपल्या वडिलांना भेटण्याची तीव्र ओढ असतानाच एक अशी व्यक्ती वडील म्हणून समोर येते, ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केलेली नसते. अशा वेळी मुलाची झालेली अवस्था, वडील म्हणून त्यांना स्वीकारताना मनात होत असलेली चलबिचल यात पाहायला मिळत आहे. त्याच्या आईने इतक्या वर्षांपासून वडिलांची ओळख का लपवून ठेवली? तसेच मुलगा हे कारण कळल्यानंतर वडिलांना स्वीकारणार का? या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहे.

आणखी वाचा : “हृदयाला छिद्र, रक्तवाहिन्या बंद आणि फक्त सहा महिने…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाली “तिला भूल देणंही…”

दरम्यान ‘शॉर्ट अँड स्वीट’ हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाची छाप पाडणारे श्रीधर वाटसर आणि मालिकेतून घराघरांत पोहोचलेले हर्षद अतकरी, रसिका सुनील यांसारख्या उत्कृष्ट कलाकार झळकणार आहेत. याबरोबर यूट्यूबर आणि रील विश्वातील तुषार खैर आणि कॉमेडी किंग ओमकार भोजनेही यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असतील. शुभम प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे गणेश कदम दिग्दर्शक आहेत. तर पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. येत्या ३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonali kulkarni harshad atkari rasika sunil upcoming movie sshort and ssweet trailer release nrp
First published on: 20-10-2023 at 16:40 IST