रजनीकांत नावाचे गारुड गेली अनेकवर्ष तामिळ चित्रपटसृष्टीवर आहे. रजनीकांत यांची क्रेझ तर फक्त भारताचं नव्हे तर परदेशातदेखील आहे. रोबोट’, कबाली’, ‘शिवाजी’, ‘अन्नाते’ आणि ‘लिंगा हे त्यांचे गेल्या काही वर्षातील सुपरहिट चित्रपट आहेत. या चित्रपटांनी ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रजनीकांत रजनीकांत यांचा आज ७२वा वाढदिवस आहे. गेली अनेक दशकं दमदार अभिनयाने ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. चित्रपटातील त्यांचे डायलॉग व स्टाइलची क्रेझ आजही कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रजनीकांत यांनी हिंदी दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. मात्र त्यांना मराठी चित्रपटात काम करायचे, खुद्द रजनीकांत यांनी एका मुलाखतीत ही इच्छा व्यक्त केली होती. २०२० साली आलेल्या ‘दरबार’ चित्रपटाच्या प्रमोशन निमिताने ते मुंबईत आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी हा खुलासा केला आहे. त्यांना जेव्हा एका मराठी पत्रकाराने त्यांना मराठीत संवाद साधण्यास सांगितले तेव्हा ते असं म्हणाले की “माझे मराठी हे बेळगावकडचे आहे. माझे घराणे बंगलोरचे आहे मात्र आम्ही मराठीत बोलायचो. मला एका मराठी चित्रपटात काम करण्याची संधी आली होती पण गोष्टी घडून आल्या नाहीत, पण माझी इच्छा आहे एका मराठी चित्रपटात काम करायचे आहे.” अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

“मी कंडक्टर होतो, तेव्हा त्यानेच…” उपकाराची जाण असलेले रजनीकांत, भर पुरस्कार सोहळ्यात सांगितलेली ‘त्या’ मित्राची गोष्ट

रजनीकांत यांचं संपूर्ण नाव शिवाजी गायकवाड असं आहे. थलावया अशी त्यांची चित्रपचसृष्टीत ओळख आहे. अफलातून अभिनयाच्या जोरावर त्यांनी मनोरंजन विश्वात दबदबा निर्माण केला. कधीकाळी ते कर्नाटकमध्ये बस मधील वाहकाचे काम करत होते. मात्र अभिनयाची आवड असल्याने ते मनोरंजन सृष्टीत दाखल झाले. रजनीकांत चित्रपटांतून दरवर्षी सुमारे ५०-६० कोटींची कमाई करतात. तसेच सामाजिक कार्यामध्येदेखील त्यांचा सहभाग आहे.

Rajinikanth Birthday Special: ३५ कोटींचा बंगला, महागड्या कार अन्…; सुपरस्टार रजनीकांत यांची एकूण संपत्ती माहितीये का?

रजनीकांत सध्या जेलर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. नेल्सन दिलीप कुमार हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आणि आता लगेच या चित्रपटातील रजनीकांत यांचा लूक आउट करण्यात आला आहे. यात ऐश्वर्या राय बच्चनदेखील दिसणार आहे. याबरोबरच शिव कार्तिकेयन, प्रियांका अरुल मोहन, रम्या कृष्णन हे देखील चित्रपटात दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Superstar rajanikanth confessed that he got opportunity to work in marathi film spg
First published on: 12-12-2022 at 13:09 IST