ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. नाटक मालिका चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विनोदी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबरोबर खासगी आयुष्यातील घडामोडींचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत नयना आपटे यांनी एका चित्रपटादरम्यानचा किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा- शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”

नयना आपटे म्हणाल्या, “रामानंद सागर यांच्या चरस या चित्रपटासाठी मला बोलवण्यात आलं होतं. या चित्रपटात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी काम करणार होते. त्यात मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही बिकनी आणि स्विमिंग सूट घालता. मी त्यांना सांगितलं मी हे करणार नाही. पण ते म्हणाले की ही आमच्या रोलची डिमांड आहे. पण मी नकार दिल्यामुळे मला त्या भूमिकेसाठी नाकारण्यात आलं.”

हेही वाचा- फडणवीसांच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर तेजस्विनी पंडितच्या सोशल अकाउंटवर कारवाई; रोहित पवार म्हणाले, “इतका कपटीपणा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नयना आपटेंच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर वयाच्या चौथ्या वर्षापासून त्या मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांतून काम करत आहेत. वयाच्या ७ व्या वर्षी शांता आपटे यांच्या ‘चंडीपूजा’ या चित्रपटात त्यांनी एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. १९६५ सालापासून नयना आपटे यांची व्यावसायिक अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरू झाली. नयना आपटे यांनी आजवर ६० हून अधिक विनोदी, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संगीत आणि काही गुजराती नाटकांतून भूमिका केल्या आहेत. ’शांती’, ’वक़्त की रफ़्तार’, ‘एक चुटकी आसमान’ आणि ’डोन्ट वरी हो जायेगा’ या त्यांच्या हिंदीतल्या गाजलेल्या मालिका आहेत. तसेच चूकभूल द्यावी घ्यावी, सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मराठी मालिकाही गाजलेल्या आहेत.