Mahesh Tilekar Share Angry Post On Vivek Agnihotri : बॉलीवूड प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. मराठी जेवणाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुण सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका केली जात आहे. मराठी लोकांचं जेवण म्हणजे गरिबांचं जेवण, शेतकऱ्यांचं जेवण असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते तटीकेचे धनी बनले आहेत.
मराठी जेवणाला गरिबाचं जेवण म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींवर नेटकरी चांगलेच भडकले असून त्यांनी आपल्या प्रतिक्रियांमधून पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. केवळ नेटकरीच नव्हे; तर मराठी इंडस्ट्रीमधील काही कलाकारांनीसुद्धा त्यांच्या या विधानावर पोस्टद्वारे संताप पोस्ट केला आहे.
अभिनेत्री नेहा शितोळे, अभिनेता पुष्कर जोगने विवेक अग्निहोत्रींच्या मराठी जेवणाबद्दलच्या वक्तव्यावर टीका केलीय. अशातच प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर टीका करत केली आहे.
या पोस्टमध्ये महेश टिळेकर म्हणतात, “कुठं गेला विवेक? ‘काश्मीर फाईल्स’ सिनेमाचे मोफत शो आयोजित करून विवेक अग्निहोत्रीला आर्थिक हातभार लावणारे मराठी नेते, त्याच अग्निहोत्रीने ‘मराठी जेवण हे गरिबांचे जेवण’ असा उल्लेख केल्यावर त्या अग्निहोत्रीच्या कानाखाली ‘अग्नि’ काढणार की तिथे नवरा मराठीची इज्जत काढत असताना शेजारी दात विचकत बसलेल्या पल्लवी जोशीचा साडीचोळी असा ‘माहेरचा आहेर’ देऊन सत्कार करणार?”

दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांनी ‘द बंगाल फाईल्स’च्या निमित्ताने Curly Tales ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल संवाद साधला. या संवादादरम्यान, त्यांनी मराठी खाद्यसंस्कृतीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.
विवेक अग्निहोत्री काय म्हणाले?
“मी दिल्लीहून आलो होतो. तिथे बटर चिकन, कबाब, तंदुरी असं झणझणीत आणि मसालेदार जेवण खाल्लं होतं. त्यानंतर जेव्हा मी वरण-भात खाल्लं तेव्हा असं वाटलं हे कसलं गरिबांचं जेवण… सुरुवातीला वाटायचं की, हे जेवण शेतकऱ्यांसारखं आहे, गरिबांचं आहे; पण माझ्या मते हेच आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी सर्वोत्तम आहे. मराठी जेवण म्हणजे अगदी आरोग्यदायी आणि चवदार आहे.”