केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या चित्रपटाने फक्त १७ दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात वंदना गुप्ते यांनी साकारलेली भूमिका खूप गाजत आहे. नुकतच वंदना गुप्ते यांनी या चित्रपटाला मिळणाऱ्या यशावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- “बाईपण भारी देवा’मुळे मला घरात…”; संजय मोनेंनी केला पत्नी सुकन्याबाबत मोठा खुलासा

बाईपण भारी देवा’ च्या संपूर्ण टीमने नुकतंच चित्रपटाच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन केले. यावेळी या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी चित्रपटाबद्दल भाष्य केले. यावेळी वंदना गुप्ते म्हणाल्या, “बाईपण भारी देवा चित्रपटाला बायकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. त्या खूप उत्साहाने हा चित्रपट बघायला येतात. आम्हाला बघितल्यानंतर त्यांचा उत्साह द्विगुणीत होते. त्या ओरडायला लागतात. हे बघून आम्ही धन्य होतो. आम्हाला आता वाटू लागलं आहे आम्ही सुपरस्टार झाले आहोत. शाहरुख आणि सलामान खानलाही आम्ही मागे टाकलं आहे.”

हेही वाचा- “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्त्रीयांवर आधारीत या चित्रपटाचे पुरुष वर्गातूनही कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल सुरू आहेत.

हेही वाचा- “माझे मित्र आईला घाबरतात”, सोहमने सांगितला आई सुचित्रा बांदेकरचा किस्सा; म्हणाला, “कधीही न खाल्लेल्या पालेभाज्या…”

या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईत दुप्पटीने वाढ झाली. आत्तापर्यंत या चित्रपटाने ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.