हिंदीप्रमाणेच मराठी चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर गेल्या काही दिवसांत चांगली कमाई केली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘वाळवी’, ‘वेड’, ‘बाईपण भारी देवा’ अशा काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचले. अशातच केतकी माटेगांवकर व दिपराज घुले यांचा ‘अंकुश’ हा जबरदस्त कमर्शियल व मसाला चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला.

या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा काही प्रतिसाद मिळाला नसल्याने हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. या चित्रपटासाठी व याच्या प्रमोशनवर भरपूर पैसा खर्च करण्यात आला होता, याबरोबरच दिग्गज कलाकारही या चित्रपटात दिसले तरी प्रेक्षकांवर छाप पाडण्यात हा चित्रपट अपयशी ठरला आहे. याबरोबरच चित्रपटातील मुख्य अभिनेता ज्याने अंकुश ही भूमिका साकारली आहे त्या दिपराज घुलेला सध्या सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आणखी वाचा : मणीरत्नम पुन्हा ‘दिल से’ व ‘बॉम्बे’सारखे चित्रपट बनवू शकतील का? पत्नी सुहासिनी यांनी दिलं उत्तर

या चित्रपटाद्वारे राजाभाऊ अप्पाराव घुले यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं असून कसलीही पार्श्वभूमी नसलेल्या दिपराज घुलेने या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं आहे. बिग बजेट अॅक्शन थ्रिलर चित्रपट जरी असला तरी याला लोकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही, उलट दिपराज हा अभिनयात फार कच्चा असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. अॅक्शन, नृत्य, अभिनय कशातूनच दिपराज हा प्रेक्षकांवर आपली छाप पाडून घेण्यात अपयशी ठरला आहे.

ss4
फोटो : सोशल मीडिया
ss5
फोटो : सोशल मीडिया
ss6
फोटो : सोशल मीडिया
ss7
फोटो : सोशल मीडिया

सोशल मीडियावर या गाण्याच्या व्हिडीओजखाली लोक कॉमेंट करून दीपराजल चांगलंच ट्रोल करत आहेत. सध्या दिपराज सिव्हिल इंजिनियरिंगचं शिक्षण घेत असून तो तिसऱ्या वर्षाला आहे. याबरोबरच त्याने अभिनय, नृत्य तसेच किक बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले आहे, त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याचे व्हिडीओजही व्हायरल झाले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व ‘केजीएफ’ फेम विक्रम मोरे यांनी या चित्रपटाचं अॅक्शन दिग्दर्शन केलं असून गणेश आचार्य यांनी यातील गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे.

परदेशात चित्रीकरण, सयाजी शिंदे मंगेश देसाई सारखे मोठे कलाकार, चांगलं बजेट असूनसुद्धा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला असून दिपराजला लोकांनी चांगलंच ट्रोल केलं आहे व चित्रपटावरही सगळ्याच स्तरातून टीका होताना दिसत आहे.