...म्हणून दिग्दर्शक रवी जाधवने पुन्हा केलं लग्न; पत्नीनेच पोस्ट केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा | marathi director ravi jadhavs wife meghana jadhav shares a special photo of their marriage | Loksatta

…म्हणून दिग्दर्शक रवी जाधवने पुन्हा केलं लग्न; पत्नीनेच पोस्ट केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा

स्पृहा जोशी, हृता दुर्गुळे यांनीही कॉमेंट करत दिल्या शुभेच्छा

…म्हणून दिग्दर्शक रवी जाधवने पुन्हा केलं लग्न; पत्नीनेच पोस्ट केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा
दिग्दर्शक रवी जाधव (फोटो : सोशल मीडिया)

‘नटरंग’, ‘बालक-पालक’, ‘टाइमपास’सारखे सुपरहीट चित्रपट देणारे मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी बॉलिवूडमध्येसुद्धा त्यांचं स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. रवी जाधव हे आता पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. रवी जाधव आणि त्याची पत्नी मेघना जाधव या दोघांच्या सोशल मीडिया पोस्टची चांगलीच चर्चा सुरू आहे.

मेघना जाधव हिने एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात मेघना आणि रवी दोघेही लग्नाचे कपडे परिधान करून आहेत. या फोटोमुळे सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. मेघनाने एका खास कारणासाठी हा फोटो शेअर केला आहे. आज त्यांच्या लग्नाचा २४ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने मेघनाने हा फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा : ‘बेल बॉटम’ चित्रपटावर पाकिस्तानी चाहत्याचा आक्षेप; खुद्द अक्षय कुमारने दिलं स्पष्ट उत्तर

फोटोबरोबरच मेघनाने लिहिलं आहे की, “आज आमच्या लग्नाला २४ वर्षं पूर्ण झाली आहेत. आम्ही १९९२ मध्ये एकमेकांना भेटलो आणि १९९८ मध्ये आमचं लग्न झालं. अविस्मरणीय आठवणींनी भरलेला हा प्रवास असाच अविरत सुरू राहू दे.” मेघनाच्या या पोस्टची सगळीकडेच चर्चा आहे. रवी जाधवनेसुद्धा त्याचा आणि मेघनाचा जुना फोटो शेअर करत पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मेघनाच्या या पोस्टवर त्यांचे चाहते आणि इतर सेलिब्रिटी लोकांनीही कॉमेंट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्पृहा जोशी, हृता दुर्गुळे यांनीही कॉमेंट करत या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. रवी जाधव आता बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनबरोबर ‘ताली’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ट्रान्सजेंडर समाजसेविका गौरी सावंतच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 13:33 IST
Next Story
“महिलांनाही एकापेक्षा जास्त पती असण्याचा हक्क…” जावेद अख्तर यांचं ‘मुस्लीम पर्सनल लॉ’बाबत वक्तव्य