नटरंग, बालक पालक अशा चित्रपटांमुळे आपले वेगळेपण व विश्वासार्हता वाढवलेला दिग्दर्शक रवी जाधव आता हिंदी चित्रपटाकडे वळलाय, ही बातमी एव्हाना कदाचित तुमच्यापर्यंत पोहचील असेलच. आपण त्याला हिंदीत एक-दोन चित्रपटापुरताच राहू नकोस व पुन्हा आपला मराठी चित्रपट बरा असे म्हणऊ नकोस अशा शुभेच्छा देऊ यात का म्हणून का विचारता?
कारण, मराठी चित्रपटात यशस्वी ठरलेले बरेचसे दिग्दर्शक हिंदीत फारशी चमक दाखवू शकले नाहीत हो. सचिन पिळगावकर- प्रेम दीवाने, आजमाईश, महेश कोठारे- लो मै आ गया, विजय कोंडके- ले चल अपने संग, सचिन कुंडलकर- अय्या, केदार शिंदे- तो बात पक्की, संजीव नाईक- धडक, श्रावणी देवधर- सिलसिला प्यार का, संजय सूरकर- कोच अशी मराठीतून हिंदीत गेलेल्या दिग्दर्शकांची यादी फारशी सुखावह नाही.
या अपयशाला अपवाद आहेच म्हणा. फार पूर्वी राज ठाकूर मराठीतून हिंदीत गेले व आपला पहिलाच चित्रपट ‘जखमी’त यशस्वी ठरले. महेश मांजरेकरही वास्तव, तेरा मेरा साथ रहे वगैरै हिंदी चित्रपटाचा धडाका लावला. मंगेश हाडवले हिंदीत विशेष काही करेल असे वाटते. अन्यथा सुष्मा शिरोमणीपासून (कानून) ब-याच मराठी दिग्दर्शकांची दादागिरी मराठीतच! आशुतोष गोवारीकर, निशिकांत कामत, मधुर भांडारकर यांचा ‘डाव’ हिंदीत सुरु झाला म्हणून त्यांचे प्रकरण वेगळे.
मराठीतून हिंदीत गेलेले दिग्दर्शक गुणी होते हे, तरी गणित कुठे फसते?
संग्रहित लेख, दिनांक 14th Sep 2013 रोजी प्रकाशित
मराठी दिग्दर्शक हिंदीकडे…यशस्वीही व्हा
नटरंग, बालक पालक अशा चित्रपटांमुळे आपले वेगळेपण व विश्वासार्हता वाढवलेला दिग्दर्शक आता हिंदी चित्रपटाकडे वळलाय

First published on: 14-09-2013 at 04:11 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi directors in bollywood