कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील अंतरा आणि मल्हार ही जोडी घराघरात प्रसिद्ध आहे. या मालिकेत मल्हारची भूमिका अभिनेता सौरभ चौगुले साकारत आहे. नुकतंच सौरभ चौगुलने याने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने वडिलांसोबत जेवतानाचा अनुभव शेअर केला आहे.
सौरभ चौगुले हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध पोस्ट शेअर करत असतो. नुकतंच सौरभ त्याचे वडील रजनिश चौगुले यांना जेवण जेवण्यासाठी घेऊन गेला होता. त्यावेळी त्याने त्याचा अनुभव सांगितला आहे. ही पोस्ट शेअर करताना त्याने त्याच्या वडिलांचा हॉटेलमधील एक फोटोही शेअर केला आहे.
सौरभ चौगुलेची इन्स्टाग्राम पोस्ट
महिन्यांनी भेटायला आले होते. 30 वर्षातून पहिल्यांदाच मी माझ्या बाबांना हॉटेलात घेऊन गेलो. म्हणजे मी स्वतः lounge मध्ये टेबल बुक करुन डिनर प्लान केला. शूट वरून घरी पोहोचे पर्यंत 10.30 झाले. त्यांना pick करून हॉटेल ला पोहोचल्यावर आम्हा दोघांना खूप awkward होत होतं. बोलायचं काय?
Order द्यायची काय विचारल तर, “जास्त नको मी काही घेणार नाही.” मग शेवटी एक एक बियर आणि चिकन बिर्याणी ठरलं. त्यांच्यासाठी अश्या ठिकाणी पहिल्यांदाच होतं आणि मला त्यांच्यासोबत. 10 मिनिट दोघे काही बोललोच नाही. शेवटी मीच इकडचे तिकडचे विषय काढले. पण तेवढेच उत्तर आले. पुढे काय?
परत तीच शांतता background ला गाणी वाजत होते. मग बाबांनी shooting बदल काही विचारल मग सगळ सांगीतल. खाणं आलं जेवता जेवता हळू हळू gossip करून झालो.बिर्याणी मात्र उरली ती पार्सल घे म्हणाले Comfortable झालो रे झालो निघायची वेळ झाली बिल मी भरलं, शेवटी बाबा, विचारलच त्यांनी ,”किती झालं बिल? म्हंटलं, इतकं नाही !
घरी जायला निघालो म्हणाले “उद्या पहाटेची बस आहे. शांतता होती… आपल्याला जास्तं बोलता आलं नाही म्हणून थोडं upset होतो. आता तर background ला गाणी पण नव्हती. मी म्हणालो, “ठीके मी सोडतो सकाळी. घर तसं जवळच होत. पण तितक्यात बाबा सुरू झाले ते पार घराच्या पसार्या पासून ते लग्ना पर्यंतचा विषय. ते मला ओरडत होते.
मला हसू येत होतं. कारण अचानक awkwardness गायब झाला होता आणि बर्याच महिन्यांनी मी त्यांचा ओरडा खात होतो. सगळ घर आवरून ठेवलं सांगितल आणि ताकीद पण दिली. अचानक झालेल्या ह्या change over ने भांबावून गेलो होतो पण मज्जा येत होती. इतक्या महिन्यांनी शिव्या खावून बिर्याणी तर जिरली पण सोबत लग्न विषय कडून dessert ची हौस पण पूर्ण केली.
घरी झोपताना स्वतःलाच म्हणालो, थोडा उशीर केलास सौरभ बाबांन बरोबर अस बाहेर हॉटेल ला जायचा. 30 वर्ष लागली. त्यांचा फोटो तर काढला पण सोबत फोटो घ्यायचा राहीलाच.., असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सौरभने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंटस पाहायला मिळत आहे. तसेच त्याची ही पोस्ट प्रचंड चर्चेत असल्याचेही दिसत आहे. विशेष म्हणजे त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.