सेल्फीचं वेड आता साऱ्यांनाच लागलं आहे. अगदी लहान मुलांपासून ते आजी- आजोबांपर्यंत अनेकांना सेल्फी म्हणजे काय हे माहित झालं आहे. आपल्या आवडत्या कलाकारांसोबत सेल्फी काढल्यावर त्यांच्या चाहत्यांना जो आनंद होतो तो शब्दात व्यक्त करणं कठीणच. पण प्रत्येकवेळी आपल्या आवडत्या कलाकारांसोबत सेल्फी काढण्याची संधी मिळेलच असे नाही. पण आता अमृता खानविलकर आणि अंकुश चौधरीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. तुम्ही या दोघांसोबत केव्हाही फोटो आणि सेल्फी काढू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे चित्रीत झाले सलमान आणि त्याच्या शेजाऱ्यांचे घर

तुमचा यावर विश्वास बसत नसेल कदाचित पण हे खरंय. कितीही गर्दी असली तरी तुम्ही त्यांच्या बाजूला शांतपणे उभे राहून सेल्फी काढू शकता. एवढंच काय तर तुम्ही त्यांच्या खांद्यावर हातदेखील ठेवू शकता. या मागचं कारण म्हणजे देवगड येथील वॅक्स म्युझियममध्ये महाराष्ट्राचे लाडके कलाकार अंकुश चौधरी आणि अमृता खानविलकर यांचे मेणाचे पुतळे साकारण्यात येणार आहेत.

सुनील कंडलूर यांनी अंकुश आणि अमृताचे हे मेणाचे पुतळे घडवण्याचे काम हाती घेतलं. याआधीही सुनील यांनी लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये सैराट फेम आर्ची आणि परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचे मेणाचे पुतळे उभारले होते. आतापर्यंत शेकडो चाहत्यांनी या म्युझियमला भेट दिली असून या पुतळ्यांसोबत सेल्फीही काढल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर अंकुश आणि अमृताचे कट्टर चाहते असाल तर काही दिवसांनी एकदा देवगड येथील वॅक्स म्युझियममध्ये जाऊन त्यांच्या मेणाच्या पुतळ्यासोबत सेल्फी काढू शकता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi stars ankush chaudhari and amruta khanvilkar wax statue in devgad wax museum
First published on: 21-08-2017 at 17:21 IST