Jameela Jamil Rishi Sunak controversy : मार्वेलच्या ‘शी-हल्क’मध्ये झळकलेली ब्रिटिश अभिनेत्री जमीला जमील तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमधून जमीलाने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांना शिवीगाळ केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. जमीलाने तिच्या या पोस्टमधून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत, पण त्यात वापरलेल्या ‘F***’ या शब्दामुळे चांगलंच वातावरण तापलं आहे.

या पोस्टमध्ये तिने ‘F*** Rishi Sunak’ असं लिहीत त्यांना अनिर्वाचित आणि उजव्या विचारांकडे झुकलेले म्हणत हिणवलं आहे. संप पुकारणाऱ्या युनियनच्या बाजूने पोस्ट करत जमीलाने लिहिलं की, “ज्या देशातील सरकारने जनतेची पूर्णपणे फसवणूक केली आहे अशा देशात लोकांना संप करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणे… ही हुकूमशाही आहे, नेतृत्व नाही. हे लोक संप करत आहेत कारण त्यांच्या त्यांना जगण्यासाठी पुरेसे पैसे मिळत नाहीयेत. या अब्जाधीश विदूषकाला त्यांना गप्प करायचे आहे. आम्ही ते होऊ देणार नाही.”

Do Muslims have more children Narendra Modi population of Muslims
मुस्लिमांना अधिक मुले असल्याचे मोदींचे वक्तव्य; आकडे काय सांगतात?
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल
Sharad pawar udyanraje bhosle satara lok sabha election
उदयनराजेंना महायुतीने डावललं तर तुम्ही तिकीट देणार का? शरद पवारांनी कॉलर उडवत दिलं उत्तर…

आणखी वाचा : शाहरुख खानच्या आई-वडिलांचीही फिल्मी स्टाइल लव्हस्टोरी; किंग खानला मिळाले वडिलांकडूनच बाळकडू

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी स्थलांतरितांना दोष देण्याच्याआधी थोडा विचार करायला हवा असं जमीलाचं म्हणणं आहे. “ज्या लोकांनी तुमचा देश सक्रिय राहावा यासाठी मेहनत घेतली आहे त्यांना पैसे आणि सुरक्षा द्या.” असं तिने तिच्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

जमीलाच्या या पोस्टवर बऱ्याच लोकांनी तिला समर्थन दिलं आहे तर काही लोकांनी याची कठोर शब्दात निंदा केली आहे. जमीला नुकतीच ‘शी-हल्क’ या वेबसीरिजमध्ये दिसली. आता तिच्या या पोस्टमुळे तिथलं राजकीय वातावरणही बदललं आहे. अजूनतरी पंतप्रधान ऋषि सुनक आणि त्यांच्या राजकीय पक्षाकडून या प्रकरणाबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.