छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. दिवसेंदिवस या मालिकेच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत सतत कोणता नवीन ट्विस्ट आणि नवीन कलाकार पाहायला मिळत आहेत. आता मालिकेत एका परदेशी अभिनेत्रीची एण्ट्री झाली आहे. ती अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आता मालिकेता नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये यशची जुनी मैत्रिणीची एण्ट्री दाखवण्यात आली आहे. यात यशा भेटण्यासाठी नेहा त्याच्या केबिनमध्ये जाते. त्याच खास कारण म्हणजे यशने नेहाला पाडव्याला एक ड्रेस गिफ्ट केलेला असतो. तोच ड्रेस दाखवण्यासाठी ती त्याच्या केबिनमध्ये जाते. पण त्याच तिच्याकडे लक्ष नसतं हे बघितल्यानंतर नाराज झालेली नेहा तिथून निघून जाते. हे पाहताच समीर यशला ही गोष्ट लक्षात आणून देतो आणि नेहाची स्तुती करण्यासाठी तिच्या जवळ जातो.

आणखी वाचा : “लतादीदी गेल्यानंतर तुम्ही जसे रडलात तसे माझ्या…”, मुमताज यांनी चाहत्यांना केली विनंती

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

आणखी वाचा : “इंजेक्शन कहीं गलत जगह लग गया?”, माधुरी दीक्षितच्या पतीचा डान्स पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु इतक्यात यशला मागून एक हाक ऐकू येते आणि एण्ट्री त्यानंतर जेसिका नावाच्या यशच्या एका परदेशी मैत्रिणीची एण्ट्री होते. आता ही अभिनेत्री आहे तरी कोण असा प्रश्न प्रेक्षकांना लागला आहे. जेसिका ही एक रशियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने अनेक मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. या अभिनेत्रीचं नाव जेन कटारिया असं आहे. या अभिनेत्रीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. जेनने अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे. आता ही पहिल्यांदा मराठी मालिकेत दिसणार आहे.