बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आयटम साँग करण्यात जास्त गुंगलेली दिसते. ‘बबली बदमाश’, ‘पिंकी’ आणि ‘राम चाहे लीला’ या तीन यशस्वी आयटम साँगनंतर ३१ वर्षीय प्रियांका आगामी ‘गुंडे’ चित्रपटात कॅब्रे नृत्य करताना दिसणार आहे.

सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केलेली प्रियांका चोप्रा ही त्या काळातील दमदार कॅब्रे नृत्यांगना हेलन यांची आठवण करून देणार आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर ७०च्या दशकातील कोलकाता आणि कॅब्रे डान्सचे जग पडद्यावर दाखवणार आहेत. यासाठी त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. ७० च्या दशकात हेलन यांनी चित्रपटात कॅब्रे नृत्याची नवी ओळख करून दिली होती. आजदेखील आपल्या नृत्यामुळे जगभरात त्या ओळखल्या जातात. आता हेलन यांची तीच शैली प्रियांका आपल्या पद्धतीने पडद्यावर साकारणार आहे. चित्रपटात प्रियांका नंदिता नावाच्या कॅब्रे डान्सरची भूमिका साकारत असून, त्यासाठी तिने विशेष प्रशिक्षण घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘गुंडे’मध्ये अर्जुन कपूर, रणवीर सिंह आणि इरफान खानदेखील मुख्य भूमिकेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.