प्राण्याच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या मेक्सिकन मॉडेल व सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरचं निधन झालं आहे. ती ३१ वर्षांची होती. लिपोसक्शन सर्जरीनंतर फुफ्फुसात रक्ताच्या गाठी झाल्या आणि त्यामुळे या मॉडेलचं निधन झालं. एलेना लॅरिया असं या मृत मॉडेलचं नाव आहे. ॲनिमल रेस्क्यू सर्व्हिसने याबाबत माहिती दिली आहे.

एलेनाच्या फुफ्फुसात रक्ताच्या गाठी झाल्या होत्या, ज्याला पल्मोनरी एम्बोलिझम देखील म्हणतात. १९ मार्च रोजी एलेनाने अखेरचा श्वास घेतला. रक्ताच्या गाठी कशा झाल्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु लिपोसक्शन सर्जरीनंतर तिचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातंय. एका अभ्यासानुसार, पल्मोनरी एम्बोलिझम लिपोसक्शननंतर होऊ शकतं, बऱ्याचदा लिपोसक्शन सर्जरीनंतर याच कारणामुळे रुग्णांचे मृत्यू होतात. यासंदर्भात ‘एनडीटीव्ही’ने वृत्त दिलं आहे. लिपोसक्शन सर्जरी ही शरीराच्या विविध अवयवांवरील अतिरिक्त चरबी हटवण्यासाठी केली जाते.

१६ व्या वर्षी घर सोडणारी ‘धाकड’ कंगना रणौत बॉलीवूडची ‘क्वीन’ झाली, पण…

“कुआकोलँडियाची संस्थापक व अध्यक्षा एलेना लॅरिया हिचं निधन झाल्याची दुःखद बातमी आम्ही देत आहेत. तिचे १९ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता पल्मोनरी थ्रोम्बोसिसमुळे निधन झाले,” अशी पोस्ट सोशल मीडियावर तिच्या टीमकडून करण्यात आली आहे.

‘द डेली बीस्ट’च्या एलेना ही एक प्रसिद्ध इन्स्टाग्राम एन्फ्लूएन्सर होती. ती प्राण्यांच्या हक्कासाठी काम करायची. यासाठी तिने कुआकोलँडिया नावाची संस्था सुरू केली होती. तिच्या निधनानंतर चाहते शोक व्यक्त करत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून तिला श्रद्धांजली वाहिली जात आहे.