हॉलीवूड दिग्दर्शक मायकेल मूर यांच्या मते डोनाल्ड ट्रम्प हा आण्विक शस्त्रांच्या पेटीची चावी खिशात घेऊन फिरणारा एक माथेफिरू माणूस आहे. ज्या दिवशी त्याचे डोके सटकेल त्या दिवशी तो बटण दाबून संपूर्ण मानव संस्कृतीचा नाश करून टाकेल. नुकत्याच एका मुलाखतीत मायकल यांनी ट्रम्पवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. हॉलीवूड सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या मायकेल मूर यांची चित्रपट माध्यम म्हणजे काय? हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी एक मुलाखत घेण्यात आली होती. यात चित्रपट निर्मितीच्या विविध अंगांनी दिग्दर्शन म्हणजे काय?, दिग्दर्शकाचा दृष्टिकोन कसा असावा?, चित्रपटाची पटकथा कशी तयार केली जाते?, अभिनय म्हणजे काय? आणि दृश्यमाध्यमांतील विविध संधी यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी विद्यर्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, एका विद्यार्थ्यांने जर त्यांना डोनाल्ड ट्रम्पवर चित्रपट तयार करण्याची संधी मिळाली तर ते स्वीकारतील का?, असा पेचात टाकणारा प्रश्न विचारला. परंतु, एका क्षणाचाही विलंब न करता त्यांनी नाही असे उत्तर दिले. त्यांच्या मते चरित्रपट हे आदर्श व्यक्तिमत्त्वांचे केले जातात. प्रत्येक यशस्वी माणसांवर चित्रपट तयार केले जात नाहीत. ट्रम्प हा यशस्वी असला तरीदेखील तो एक लबाड माणूस आहे. त्याचे यश हे त्याचे वैयक्तिक असून त्यामुळे मानव समाज संकटात आला आहे. तो एक माथेफिरू माणूस असून बिनडोक लोकांचा आदर्श असू शकतो. त्याची वृत्ती समाज विघातक आहे. या वृत्तीला दृश्यमाध्यमांतून खतपाणी न देता वेळीच रोखणे गरजेचे आहे, अशा परखड शब्दांत मायकेल मूर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलचे मत मांडले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2017 रोजी प्रकाशित
बिनडोक माणसाच्या हाती आण्विक शस्त्रांची चावी
ज्या दिवशी त्याचे डोके सटकेल त्या दिवशी मानव संस्कृतीचा नाश अटळ
Written by मंदार गुरव

First published on: 27-08-2017 at 02:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Michael moore donald trump hollywood katta part