भवतालचा परिसर, उत्तम शिक्षण व पालकांनी केलेले संस्कार या आधारे माणसाचे व्यक्तिमत्त्व घडत असते. यातूनच त्याच्यात योग्य व अयोग्य गोष्टी समजण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे कोणतेही पालक आपल्या मुलांना वाईट सवयींपासून लांब ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. परंतु अभिनेत्री मिला कुनिससारखेही काही पालक आहेत, जे या आदर्शवादी पालकांपेक्षा काहीसे वेगळे आहेत. काही दिवसांपूर्वी कुत्रे सांभाळणे व लहान मुलांचे पालनपोषण करणे यात बरेच साम्य आहे, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या या अभिनेत्रीने तिची तीन वर्षांची मुलगी मदिरा सेवन करते, असा आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. तिची मुलगी दर शुक्रवारी वाइन पिते. यहुदींचा दर आठवडय़ात येणारा सब्बात हा सण मिलाच्या घरी साजरा केला जातो. तिच्या मते या दिवशी वाईन पिण्याला एक वेगळे महत्त्व आहे. तसेच दारूचे सेवन मर्यादेत राहून केले तर ती दुधाप्रमाणेच शरीराला पोषक ठरू शकते. त्यामुळे तिने आपल्या तीनवर्षीय मुलीला वाईन सेवनाचे व्यसन लावले आहे, असा दावा तिने केला आहे. या बातमीमुळे समाजमाध्यमांवर मिलाविरोधात टीकेची एकच लाट उसळली असून अनेक पालक, सामाजिक संस्थांनी तिच्या मानसिकतेवरच प्रश्न उपस्थित करत तिच्याविरोधात आंदोलन पुकारण्याची घोषणा केली आहे. मिलाने मात्र या सर्वाकडे दुर्लक्ष करून आपल्याला योग्य वाटते तेच आपण करतो असे स्पष्टीकरण दिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Nov 2017 रोजी प्रकाशित
सेलिब्रिटी मायलेकींचे वाईन सेलिब्रेशन!
या अभिनेत्रीची तीन वर्षांची मुलगी मदिरा सेवन करते
Written by मंदार गुरव

First published on: 05-11-2017 at 01:18 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mila kunis lets three year old daughter wyatt drink sip of wine every friday for shabbat hollywood katta part