देशातील पहिला पुरुष सुपर मॉडल म्हणून अभिनेता मिलिंद सोमण ओळखला जातो. मिलिंदची पत्नी अंकिता कोनवार ही सोशल मीडियावर तिचं मत मांडताना दिसते. नुकतीच अंकिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने ईशान्य भारतातील लोकांना संपूर्ण भारतात कशी वागणूक दिली जाते हे यावर भाष्य केले आहे.
अंकिताने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. अंकिताने ही पोस्ट मिराबाई चानूने जिंकलेल्या ऑलिम्पिकमध्ये मेडलवरून आहे. “तुम्ही जर ईशान्य भारतातले असाल आणि जर तुम्ही भारतासाठी पदक जिंकलं तरच तुम्ही भारतीय म्हणून ओळखले जाऊ शकता. नाही तर आपण सगळे ‘चिंकी’, ‘चीनी’, ‘नेपाळी’ किंवा मग ‘करोनाचा कोणता तरी नवीन प्रकार’ म्हणून ओळखले जातो. भारत फक्त जातिवादच नाही तर वर्णभेदानेही ग्रासलेला आहे. माझ्या अनुभवांवरून बोलते #Hypocrites.” अंकिताने लोकांना ढोंगी म्हणतं हे हॅशटॅग वापरलं आहे. अंकिता ही ईशान्य भारतातील आसाम मधली आहे. अंकिताची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती
View this post on Instagram
आणखी वाचा : “शिल्पा शेट्टीला नक्कीच माहीत असणार पतीचे कारनामे”
मिराबाई चानू सैखोमने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सगळ्यात पहिलं पदक जिंकली. त्यानंतर तिला शुभेच्छा देत सगळ्या नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या. ते पाहता अंकिताने ही पोस्ट शेअर केली आहे. कारण मिराबाई चानू ही देखील ईशान्य भारतात असलेल्या आसाम राज्यातील इंफाळ या परिसरात राहणारी आहे. मिराबाई चानूने ४९ किलो या वजन गटात रौप्य पदक जिंकत भारताचे नाव वेटलिफ्टिंगमध्ये वर आणले आहे.