नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) जाहीर करण्यात आला झाला आहे. या परिक्षेत प्रसिद्ध मॉडेल ऐश्वर्या श्योराण हिने बाजी मारली आहे. फेमिना मिस इंडिया स्पर्धेत फाइनलिस्ट ठरलेल्या ऐश्वर्याने UPSC परिक्षेत चक्क ९३ वा क्रमांक पटकावला आहे. सोशल मीडियाद्वारे चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
फेमिना मिस इंडियाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन याबाबत माहिती देण्यात आली. “फेमिना मिस इंडिया २०१६ची फायनलिस्ट, कँपस प्रिंसेस दिल्ली २०१६, फ्रेशफेस विजेता २०१५ ऐश्वर्या श्योराण हिने UPSC परिक्षेत ९३ वा क्रमांक पटकावला आहे. परीक्षेतील मिळवलेल्या या भरघोस यशाबद्दल अभिनंदन. UPSC परिक्षेत यश मिळवणं सोप नसतं. परंतु ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली.” अशा आशयाची पोस्ट लिहून तिचं कौतुक केलं आहे.
Happy to see people pursuing diverse interests in life choosing Civil Services as a career. #NewIndia needs #NewAgeOfficers who make the service more representative, more open & more contemporary!
Welcome aboard #AishwaryaSheoran Rank 93, CSE 19; a top model & now an officer!! pic.twitter.com/jCUt60aN0x— Abhishek Singh (@Abhishek_asitis) August 4, 2020
UPSC परिक्षेत महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. तर जतिन किशोर दुसऱ्या क्रमांकावर असून प्रतिभा वर्मा तिसऱ्या आणि महिला उमेदवारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
कसा बघाल युपीएससीचा निकाल
- UPSC चा निकाल पाहण्यासाठी http://www.upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- Civil Services Examination, 2019 या लिंकवर क्लिक करा.
- या पीडीएफमध्ये तुमचे नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर पाहा
- पीडीएफ फाइल डाउनलोड करून प्रिंटही काढू शकता.