आज पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली. बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी काही दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. दरम्यान, त्यांची एक मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत त्यांनी स्वत:ला मोदी भक्त म्हटल्या जाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मिथुन चक्रवर्ती यांची ही मुलाखती बीबीसी हिंदीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यात मिथुन चक्रवर्ती स्वत:ला मोदींचे फॉलोवर म्हणाले आहेत. “मी मोदींचा चाहता आहे,”असे मिथून म्हणतात. त्यावर पत्रकार त्यांना बोलतो की, “मोदींचे क्रिटीक्स मोदींच्या चाहत्यांना ‘मोदी भक्त’ म्हणतं टीका करतात. तर तुम्ही स्वत:ला ‘मोदी भक्त’ म्हणाल?” त्यावर उत्तर देत मिथुन म्हणाले, “हरकत नाही, ही सन्मानाची गोष्ट आहे. ते जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे नेते आहेत. मी त्यांच्या समोर एक छोटासा सर्वसामान्य माणूस आहे.”
मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालच्या ब्रिगेड परेड मैदानात एका रॅलीच्या दरम्यान, ७ मार्च रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये पदार्पण केले. भारतीय जनता पार्टीचे अनेक मोठे नेते त्या रॅलीत होते.
