scorecardresearch

Video : आईचे स्तन दिसू नये म्हणून लेकीने केलं असं काही की अभिनेत्री-मॉडेल झाली ट्रोल, ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली, “माझ्या स्तनांमुळे…”

आई स्वयंपाक करत असताना मुलीने शूट केला व्हिडीओ, कॅमेऱ्यामध्ये स्तन दिसले म्हणून लेकीने केलेल्या कृतीमुळे लेखिका-मॉडेल ट्रोल

Video : आईचे स्तन दिसू नये म्हणून लेकीने केलं असं काही की अभिनेत्री-मॉडेल झाली ट्रोल, ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली, “माझ्या स्तनांमुळे…”
आई स्वयंपाक करत असताना मुलीने शूट केला व्हिडीओ, कॅमेऱ्यामध्ये स्तन दिसले म्हणून लेकीने केलेल्या कृतीमुळे लेखिका-मॉडेल ट्रोल

कलाकार चाहत्यांशी, प्रेक्षकांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधताना दिसतात. खासगी आयुष्याशी तसेच कामाबाबत अनेक पोस्टही शेअर करताना दिसतात. पण बऱ्याचदा या कलाकार मंडळींना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. असंच काहीसं आता एका अभिनेत्रीबरोबर घडलं आहे. भारतीय-अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल, लेखिका, सुत्रसंचालिका पद्मा लक्ष्मीलाही ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.

आणखी वाचा – शहरातलं घर सोडून महाबळेश्वरमध्ये राहतेय सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, फोटो शेअर करत सांगितलं कसं जगतेय आयुष्य?

पद्मा लक्ष्मीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती स्वतः स्वयंपाक करताना दिसत आहे. तर तिची लेक हा व्हिडीओ शूट करत आहे. पद्माची मुलगी व्हिडीओमध्ये दिसत असलेले तिच्या आईचे स्तन लपवत आहे. “माझे स्तन लपवत आहेस का? पण तू दीड वर्ष इथूनच दूध प्यायली आहेस.” असं पद्मा आपल्या लेकीला गंमतीने म्हणते.

या व्हिडीओवरुनच तिला ट्रोल करण्यास सुरुवात करण्यात आली. मुलगीला तुझ्या स्तनांमुळे त्रास होत आहे असं अनेकांनी कमेंट करत म्हटलं. यावरच ट्रोल करणाऱ्यांना पद्माने अगदी सडेतोड उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, “सर्वप्रथम तर हा गंमतीने शूट केलेला व्हिडीओ आहे.”

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

“माझी मुलगी माझ्या स्तनांमुळे, माझ्यामुळे किंवा माझ्या पोस्टमुळे अस्वस्थ नाही. ती या कमेंट्सही वाचत नाही. कारण ती सोशल मीडियावर सक्रिय नाही.” पद्मा लक्ष्मीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 13:19 IST

संबंधित बातम्या