बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने काही महिन्यांपूर्वी आई झाली आहे. दियाने एका मुलाला जन्म दिला आहे. आता दियाने सार्वजनीक ठिकाणी स्तनपान करताना येणाऱ्या आव्हानांविषयी वक्तव्यं केलं आहे. नुकत्याच आई झालेल्या स्त्रीयांना स्तनपान करण्यासाठी सुरक्षित जागा नाही आणि सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करायला लाज वाटते तर त्यांच्यावर कमेंट केल्या जातात, असे दिया म्हणाली आहे.

नुकतीच दियाने जागतिक स्तनपान आठवड्याच्या निमित्ताने ‘मिड-डे’ला मुलाखत दिली. “ज्या स्त्रीया नुकत्याच आई झाल्या आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी जागा नसल्याबद्दल मला आता जाणवलं आहे. खासकरून जेव्हा ते सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील तेव्हा त्यांच्यावर याचा जास्त परिणा होतो. मग, या गोष्टीवर आपण कधी बोललो का नाही?, एका आईसाठी गुपचूप कुठे बांधकाम होत असलेल्या ठिकाणी, शेतात आणि रस्त्याच्याकडेला कुठे तरी प्रायव्हसीशिवाय स्तनपान करणे कठीण आहे,’ असे दिया म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

आणखी वाचा : प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक

पुढे दिया मिर्झा म्हणाली, ‘बेल्जियममध्ये सार्वजनिक ठिकाणी स्तनपानाला कायद्याचे संरक्षण आहे. पण, आपल्याकडे स्तनपानाविषयी समाजामध्ये मानसिक बदल घडवून आणण्याची गरज आहे. लहान बाळाला स्तनपान करने ही नैसर्गिक कृती असल्याचे मान्य करायला पाहिजे. मात्र, जेव्हा सार्वजनिक ठिकाणी स्तनपान केले जाते तेव्हा या कृतीला लाजिरवाण असल्याचे ठरवतं त्यावर मतं मांडली जातात.’

आणखी वाचा : ‘हम उस महान छत्रपती शिवाजी की औलाद हैं, जिन्होंने…’, अंगावर येतील शहारे… पहा ‘भुज’चा दुसरा ट्रेलर

पुढे दिया म्हणाली, ‘जागतिक आरोग्य संघटना केवळ पहिल्या सहा महिन्यांसाठी स्तनपान करणाऱ्याचा सल्ला देते. ज्या बाळाला आईचे दुध मिळत नाही. त्या बाळाचा सुरुवातीच्या महिन्यात मृत्यू होण्याची शक्यता ही इतरांच्या तुलनेत सहा ते दहा पट जास्त असते. यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज आहे की या सगळ्या कारणांमुळे भारतात कुपोषीत आणि मृत्यू होणाऱ्या मुलांची संख्या ही जास्त आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

दरम्यान, गेल्या महिन्यात एक पोस्ट शेअर करत दियाने मे महिन्यात बाळाला जन्म दिल्याचे सांगितले. दियाचं बाळ प्रीमँच्युअर म्हणजे वेळे आधीच जन्माला आलं होतं. त्यानंतर दोन महिन्यांपासून ते आयसीयूमध्ये आहे. “मला गरोदरपणात अचानक अ‍ॅपेंडेक्टॉमी आणि गंभीररित्या बॅक्टेरियल इंफेक्शन झालं. हे जीवघेणं ठरू शकलं असतं. नशीबाने आमच्या डॉक्टरांनी वेळेत काळजी घेत सी-सेक्शन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाळाचा सुरक्षितरीत्या जन्म होवू शकला,’ असं दियाने त्या पोस्टमध्ये सांगितलं.