अभिनेत्री मोनालिसा बागलने अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. लवकरच मोनालिसा एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोनालिसा लवकरच ‘रावरंभा’ या ऐतिहासिक सिनेमात झळकणार आहे.

या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हापासून या सिनेमा विषयी अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. नुकताच या सिनेमाचं स्क्रीप्ट पूजन पार पडलं असून लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. शंभू महादेवाच्या साक्षीने हा सोहळा पार पडला असून यावेळी श्री प्रताप दादा गंगावणे, अनुपजी जगदाळे,अभिनेत्री मोनालिसा बागल अशी सिनेमाती टीम उपस्थित होती.सातारा जिल्ह्यात निर्मिती होणारा हा पहिलाच चित्रपट असून जिल्ह्यातील दऱ्या-खोऱ्यांमध्ये या सिनेमाचं शूटिंग पार पडणार आहे.

श्री प्रताप दादा गंगावणे यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली असून नपुजी जगदाळे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर ‘रावरंभा : द ग्रेट वॉरियर ऑफ 1674’ या चित्रपटाची निर्मिती शशिकांत पवार प्रॉडक्शन्सचे शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे करत आहेत.

‘रावरंभा’ या सिनेमातून ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगड्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेलीय.