यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात ‘चेन्नई एक्सप्रेस’ पाठोपाठ ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’, ‘मद्रास कॅफे’ आणि ‘सत्याग्रह’ असे लागोपाठच्या चार शुक्रवारी बडे चित्रपट प्रदर्शित होण्याचा योग आला आहे. पण यापूर्वीदेखिल याच ऑगस्ट महिन्यात महत्वाचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
भारतातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ कलाकृती म्हणून गणला जाणारा रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ १९७५ च्या १५ ऑगस्ट रोजी झळकला. त्याच्या स्पर्धेत त्या दिवशी विनोदकुमारचा ‘गरीबी हटावो’ हा चित्रपट होता.
त्यानंतर १९८५ सालच्या ऑगस्टमध्ये रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सागर’ आणि राज  कपूर दिग्दर्शित ‘राम तेरी गंगा मैली’ हे चित्रपट लागोपाठच्या शुक्रवारी झळकले. तर १९९४ च्या ऑगस्टमध्ये विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ आणि सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ हे लागोपाठच्या शुक्रवारी झळकले काही वर्षापूर्वी ‘जाने तू या जाने ना’ हा चित्रपटही ऑगस्टमध्येच झळकला.
पावसामुळे वातावरणतील सुखद गारवा, कॉलेजचे प्रफुल्लित वातावरण आणि अनेक सणांच्या रजा अशा एकत्रित वातावरणचा ऑगस्टमध्ये फायदा होत असावा.