चित्रपटांची निर्मिती ही प्रामुख्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या उद्देशाने केली जाते. परंतु मार्टिन स्कोर्सेसी, वूडी अॅलन, जेम्स कॅमेरॉन, जॉर्ज रॉय हिल यांसारख्या काही दिग्दर्शकांनी पारंपरिक विचारांना छेद देऊन नवीन धाटणीचे चित्रपट तयार करण्याची प्रथा सुरू केली. या मंडळींनी समाजातील वाईट प्रवृत्ती, अंधश्रद्धा व प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्यासाठी दृष्यमाध्यमांचा योग्य वापर केला. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती समाजातील पारंपरिक विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते तेव्हा त्याला अनेकांच्या विरोधाला सामोरे जावे लागते. डॅरेन रोनोफस्की हादेखील असाच संशोधक प्रवृत्तीचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मदर’ या चित्रपटामुळे त्याला जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. या चित्रपटातून त्याने ख्रिस्ती धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप त्याच्यावर केला जातो आहे. काही विरोधकांनी तर थेट चित्रपटातील कलाकारांवरच हल्ला करून आपला निषेध नोंदवला. या विरोधात अनेक वृत्तमाध्यमांनी आवाज उठवला असला तरी देखील हॉलीवूड सिनेसृष्टीत सध्या धार्मिक तेढ दिसून येते आहे.चित्रपटातील काही दृष्यांमधून ख्रिस्ती धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचे काहींनी आरोप केले. यावर दिग्दर्शक डॅरेन रोनोफस्की याने पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माफी मागण्यास नकार दिला आहे. तसेच सर्वात प्रथम प्रेक्षकांनी ‘मदर’ पाहावा त्यातील कथा, घटना व परिस्थिती समजून घ्यावी आणि जर ते पटत नसेल तर निषेध करावा, असे त्याने विरोधकांना आवाहन केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Sep 2017 रोजी प्रकाशित
डॅरेनच्या ‘मदर’मुळे धार्मिक कलह!
डॅरेन रोनोफस्की हा संशोधक प्रवृत्तीचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.
Written by मंदार गुरव

First published on: 24-09-2017 at 03:17 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother director darren aronofsky i dont mind people being upset by the film hollywood katta part