स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील कथा आणि त्यातील कलाकार यामुळे त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. या मालिकेतील साजिरीच्या वडिलांची म्हणजेच विलास पाटील भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

या पोस्टद्वारे किरण माने यांनी विविध राजकीय विषयांवर त्यांचे मत मांडत असतात. काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी एक राजकीय पोस्ट लिहिली होती. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली होती. याद्वारे अनेकांनी त्यांना धमकीही दिली होती. यानंतर त्यांनी पुन्हा एका पोस्ट लिहित त्यांनी धमकी देणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

Uddhav Thackerays Criticism on Sanjay Mandalik and Dairhyasheel Mane
गद्दारांचा सूड घ्यायला कोल्हापुरात आलोय; उद्धव ठाकरे यांचे संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यावर टीकास्त्र
man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

किरण माने यांची पोस्ट

“ए, कशाला लिहीतो रे राजकीय पोस्ट. आमच्या नेत्याला काही बोललास महागात पडेल.” , “आमच्या पक्षाविरोधात बोलतो? तू कुठं रहातोस. पत्ता दे. तुला तिथं येऊन मारतो.” असे लै लै लै मेसेज येऊन पडत्यात. मी हिंगलूनबी इचारत नाय असल्यांना. मला बोट बी लावायचा दम नाय कुनाच्यात. मी छत्रपती शिवरायांचा मावळाबी हाय-तुकोबारायाचा शिष्यबी हाय आणि शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार रक्तात भिनवलेला वाघ बी हाय. हे कॉम्बीनेशन लै डेंजर भावांनो. नाद करू नये शहाण्यांन ! असो पण

“किरण मानेसर, आम्ही तुमचे फॅन आहोत. तुम्हाला कुणी वाईटसाईट बोललेलं आम्हाला सहन होत नाही. तुम्ही राजकारणावर लिहू नका.” असेही मेसेजेस येतात. त्यांना उत्तर देणे माझं कर्तव्य आहे. माझ्यावर प्रेम करणार्‍यांची मी कदर करतो…भावांनो, आज मी कारण सांगतो. बघा तुम्हाला पटतंय का. थांबा थांबा, त्याआधी बर्टोल्ट ब्रेख्त नांवाच्या एका महान नाटककाराची गोष्ट सांगतो. शेक्सपिअरइतकाच मोठा नाटककार आणि लै संवेदनशील कवी व्हता त्यो. आज बी आमी नाटकवाले ब्रेख्तच्या वाटेवरनं चालतो.

…ब्रेख्तच्या काळात भवताली लै बेक्कार वातावरण होतं. हिटलरच्या हुकूमशाहीनं धुमाकूळ घातलावता. चांगल्या माणसांचं जगनं मुश्कील झालंवतं. हिटलरच्या विरोधात बोललं की धमक्या, अर्वाच्य शिविगाळ तर व्हायचीच. पन अन्यायाविरोधात आवाज उठवणार्‍यांची तोंडं बंद करण्यासाठी हे नराधम कुठल्याबी खालच्या थराला जायचे. ब्रेख्तनं कुनाला न जुमानता हिटलरच्या धोरणांविरोधात जोरदार लेखन केलं. त्यावेळी हिटलर विरोधात लिहिणार्‍यांच्या पुस्तकांवर हिटलर बंदी घालायचा. पन कसं कुणास ठावूक? हिटलरच्या शातीर नजरेतनं ब्रेख्तचं पुस्तक सुटलं व्हतं. त्या पठ्ठ्यानं थेट हिटलरला पत्र लिव्हलं – “मी पण तुझ्या विरोधात लिहिले आहे. कृपा करून माझ्या पुस्तकावर बंदी घाल. नाहीतर इतिहास असं समजेल की मी तुझ्या बाजूनं होतो. किंवा असंही समजलं जाईल की मी इतकी महत्त्वाची व्यक्ती नव्हतो की तू घाबरुन माझ्या पुस्तकावर बंदी घालावीस.”

…गड्याहो, भवताली मानवतेविरोधात गोष्टी घडतायत आनि कलाकार त्याबद्दल संवेदनशील नसंल तर तो मुर्दाड आहे ! राजकारण दुर्लक्षित करू नका. कुना लुंग्यासुंग्यांच्या शिवीगाळीला, ट्रोलींगला घाबरुन राजकारणावर बोलनं टाळू नका. ब्रेख्तनं लिहुन ठेवलंय.. तेच इस्कटून सांगतो.. राजकारण हे आपल्या, आपल्या आईबापांच्या, आपल्या मुलाबाळांच्या जगन्याची किंमत ठरवतं. आपन खात असलेली डाळ, भात, मासे, मटन, पीठ-मीठ, चप्पलची किंमत, हाॅस्पीटल बिलं, औषधांच्या किमती, पेट्रोल-डिझेल-गॅसच्या किमती…सगळं सगळं सग्ग्गळं राजकीय निर्णयांवरनं ठरतं !! ते दुर्लक्षून कसं चालंल??? जो माणूस छाती फूगवून सांगतो, की “राजकारण लै बेकार म्हणून मी त्यावर बोलत नाय.” तो माणूस मूर्ख बेअक्कल असतो..

…तुम्ही राजकारणाकडं केलेल्या दुर्लक्षातूनच जन्माला येत्यात वेश्या… बेवारशी पोरं… चोर… पाकीटमार.. दरोडेखोर.. बलात्कारी.. धार्मिक हिंसा घडवून आननारे जल्लाद आनि सगळ्यात वाईट म्हणजे या अज्ञानातूनच तुमच्या उरावर नाचतात भ्रष्ट सरकारी अधिकारी, तळवेचाटू पत्रकार आणि अर्वाच्य शब्दांत ट्रोलिंग करनारी हुकूमशहांची पिलावळ !!!

आपनबी ब्रेख्त होऊया भावांनो. जागे होऊया. बोला बिन्धास्त. करूद्या ट्रोलिंग. बघूया त्यांचा क्रूरपणा श्रेष्ठ हाय का आपली संवेदनशीलता… नाहीतर आपली पुढची पिढी समजंल की आपन छाटछूट व्हतो.. भेकड व्हतो.. हुकूमशहाच्या पिलावळींनी शिवीगाळ करन्याइतकंबी महत्त्व आपल्याला नव्हतं !!! तुका म्हणे मानदंभ जया चित्ती । तयाची फजिती करू आम्ही ।। इठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल….- किरण माने, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगली व्हायरल होत आहे.

‘मुलगी झाली हो’ मधील विलास पाटलांनी शेअर केला टाटांच्या वाढदिवसाचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाले “अनेकांच्या सणसणीत कानफाडीत…”