छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत बबीताजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकटसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या सुरु होत्या. या चर्चा पाहता मुनमुनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिची प्रतिक्रिया दिली आहे.

मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिली पोस्ट शेअर करत, “कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्यावर काल्पनिक बातमी देण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले आहेत? तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या आयुष्यावर जो काही परिणाम होतो किंवा बदल होतो त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात का? एखाद्या स्त्रीने नुकताच तिचा मुलगा किंवा मग प्रियकर गमावला असेल तरी तुम्ही त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढतात, हे सगळं फक्त तुम्ही तुमच्या टीआरपीसाठी करता. पाहिजे तसे वृत्त किंवा हवं ते हेडिंग देत तुम्ही कोणाच्या ही प्रतिष्ठेला धक्का देऊ शकतात, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतर तुम्ही या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि जर तुम्ही ते करू शकत नसाल तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटली पाहिजे,” असे मुनमुन या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@mmoonstar)

आणखी वाचा : एक्स गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी सलमानने लावले होते खोटे दात! कारण ऐकून तुम्हालाही हसू होईल अनावर

 

View this post on Instagram

 

A post shared by (@mmoonstar)

आणखी वाचा : ‘याला म्हणतात संस्कार’, बिग बींची नात आराध्याचा डान्सनंतर भजन गातानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दुसऱ्या पोस्टमध्ये मुनमुन म्हणाली, ‘मी तुमच्या सगळ्यांकडून खूप चांगल्या अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र, कमेंट सेक्शनमध्ये जो तुम्ही अश्लीलपणा केला आहे, एवढंच नाही तर आपला समाज कसा पाठी जाऊ शकतो हे शिक्षकलेल्या लोकांनी देखील दाखवलं आहे. तुमच्या विनोदासाठी स्त्रीयांना नेहमीच त्यांच्या वयावरून, आईला लाजवलं जातं. तुमच्या या विनोदाचा समोरच्या व्यक्तीवर काही परिणाम होतो किंवा नाही याचं तुम्हाला काही वाटतं नाही. १३ वर्षांपासून तुमचे मनोरंजन करत आहे आणि माझी प्रतिष्ठा उद्वस्त करण्यासाठी तुम्हाला १३ मिनिटे लागली नाहीत. यामुळे पुढच्यावेळी जर कोणी नैराश्येचा सामना करत असेल किंवा स्वत: चा जीव घेण्याचा प्रयत्न करत असेल तर थांबून जरा विचार करा, हे सगळं तुमच्यामुळे तर झालेल नाही ना. आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय,’ अशी पोस्ट शेअर करत मुनमुनने तिच्या आणि टप्पू रिलेशनशिपमध्ये असलेल्या चर्चांवर संताप व्यक्त केला आहे.