जय भानुशाली आणि सनी लिओनी सध्या ‘एक पहेली लीलाट या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी एकत्र फिरत आहेत. मात्र, प्रत्येक ठिकाणी सनी लिओनी भलताच भाव खाऊन जात आहे. त्यामुळे प्रमोशनदरम्यान सनी लिओनी सतत प्रकाशझोतात राहिल्यामुळे जय भानुशालीकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा इंडस्ट्रीत सुरू आहे. मात्र, मला सनीमुळे असुरक्षित वाटत नसल्याचे जय भानुशालीने सांगितले.
सनीमुळे असुरक्षित वाटायला मी काही लहान मुलगा नाही, असे जयचे म्हणणे आहे. मुळात माझी स्पर्धा ही सनी लिओनीबरोबर नाही. सनीऐवजी मला बॉलीवूडमधील पुरूष कलाकारांपासून असुरक्षित वाटायला पाहिजे, असेही त्याने यावेळी सांगितले.
टेलिव्हिजनच्या दुनियेतून कारकीर्दीची सुरूवात करणाऱ्या जय भानुशालीने आतापर्यंत ‘हेट स्टोरी २’ आणि ‘देसी कट्टे’ या बॉलीवूडपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांच्या दुनियेत आल्यानंतर जय भानुशालीने टेलिव्हिजनपासून काहीसी फारकत घेतली होती. मी टेलिव्हिजनच्या दुनियेतून कायमचा बाहेर पडलेलो नाही. मात्र, सध्या मी संपूर्ण लक्ष चित्रपटांवर केंद्रित केले आहे. भविष्यात मी टेलिव्हिजनवर नक्कीच सुत्रसंचालन करेन, असे जयने सांगितले.
‘एक पहेली लीला’ या चित्रपटातील भूमिकेविषयी विचारले असता, यापूर्वी मी कधीही अशाप्रकारची भूमिका केली नसल्याचे सांगितले. त्यामुळे या भूमिकेविषयी मी समाधानी असल्याचे त्याने म्हटले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2015 रोजी प्रकाशित
माझी स्पर्धा सनी लिओनीबरोबर नाही- जय भानुशाली
जय भानुशाली आणि सनी लिओनी सध्या 'एक पहेली लीलाट या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी एकत्र फिरत आहेत. मात्र, प्रत्येक ठिकाणी सनी लिओनी भलताच भाव खाऊन जात आहे. त्यामुळे प्रमोशनदरम्यान सनी लिओनी सतत प्रकाशझोतात राहिल्यामुळे जय भानुशालीकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा इंडस्ट्रीत सुरू …

First published on: 26-03-2015 at 03:28 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My competition is not with sunny leone jay bhanushali